sharad pawar esakal
देश

हताशपणाचं गांभीर्य लक्षात घ्या, युक्रेनमध्ये भारतीय ठार झाल्यानंतर पवारांचं केंद्राला आवाहन

दिवसेंदिवस तणाव वाढत असल्याने युक्रेनमधील भारतीयांना अडचणींना सामोरे जावं लागत आहे.

दत्ता लवांडे

युक्रेन आणि रशियाचा तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. युक्रेनमध्ये सध्या भारताचे हजारो नागरिक आणि विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना भारतात आणण्याचं काम भारताकडून चालू आहे. युक्रेनमध्ये रशियन सैनिकांनी हल्ले करून महत्त्वाच्या शहरांना घेराव घातल्यामुळे भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी आव्हानं निर्माण होत आहेत. दिवसेंदिवस तणाव वाढत असल्याने तेथील भारतीयांना अडचणींना सामोरे जावं लागत आहे.

दरम्यान आज सकाळी रशियाच्या बॉम्ब हल्ल्यात भारतातील एक विद्यार्थी ठार झाला आहे. तो कर्नाटक राज्यातील होता. युक्रेनमधील भारतीय सीमेकडे जात असताना रशियन सैनिकांकडून त्यांना मारहाण करण्यात आली होती. भारताकडून युक्रेनमधील नागरिकांना आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत.

त्यासाठी भारताने 'ऑपरेशन गंगा' नावाची मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेद्वारे भारतातून विमाने पाठवून नागरिकांना परत आणण्यात येत आहे. सध्या या मोहीमेअंतर्गत बऱ्याच भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थांना मायदेशात आणण्यात आलं आहे. अजूनही काही भारतीय अडकलेले आहेत.

दरम्यान राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना आवाहन केलं आहे. शरद पवार यांना ट्वीट करत म्हटलंय की, "मी केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना विनंती करतो की, त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्यावं. तसंच विद्यार्थी, त्यांचे कुटुंबीय यांची दुर्दशा आणि हताशपणाचं गांभीर्य लक्षात घ्या." असं अवाहन त्यांनी ट्वीट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : इशा सिंग अन् चीनच्या शाओनेचे समान ३८ गुण, तरीही भारतीय नेमबाजाला मिळाले रौप्यपदक; असं का?

Vinod Kambli Viral Video: विनोद कांबळी वृद्धाश्रमात असल्याचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं? पत्नी अँड्रियाने केला मोठा खुलासा

Maharashtra Drought Relief : मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Mumbai Malaria: मुंबईत मलेरियाचा वाढता धोका! रुग्णसंख्या ९ हजारांवर; वर्षभरात ४१ टक्क्यांनी वाढ

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आज ‘मामा गोल्ड रिंग योजना’ सुरू करणार

SCROLL FOR NEXT