Russia Ukraine War chief justice n v ramana questioned can we ask russia president putin to stop war
Russia Ukraine War chief justice n v ramana questioned can we ask russia president putin to stop war  
देश

'मी काय पुतीन यांना युद्ध थांबवण्याचे निर्देश देऊ शकतो का?' - CJI

सकाळ डिजिटल टीम

रशिया आणि युक्रेनमधील (Russia Ukraine War) युद्धाचा आज आठवा दिवस आहे. युक्रेनमधील युद्धग्रस्त भागातून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारकडून ऑपरेशन गंगा ही मोहीम चालवली जात आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारला निर्देश द्यावेत, यासाठी एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी झाली.

युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. सरन्यायाधीश एन व्ही रमणा (CJI N V Ramana) यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, भारत सरकार भारतीयांना बाहेर काढण्याचे काम करत आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालय काहीही करू शकत नाही, "न्यायालय काय करेल? मी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना युद्ध थांबवण्याचे निर्देश देऊ शकतो का?" असे CJI म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, 'सोशल मीडियावर, मी CJI काय करत आहेत असे काही व्हिडिओ पाहिले! , आम्हाला विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूती आहे, आम्हाला खूप वाईट वाटते. पण आम्ही रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना युद्ध थांबवण्याची सूचना देऊ शकतो का? असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान याचिकाकर्त्या वकिलाने खंडपीठाला सांगितले की, विद्यार्थ्यांना युक्रेनमधून रोमानियाला जाण्यापासून रोखले जात आहे. विद्यार्थी थंडीमुळे गारठून जात आहेत, त्यांनी काळजी घ्यायला हवी. यावर सरन्यायाधीश म्हणाले की, कोण काळजी घ्यायला हवी, सरकार आधीपासूनच काळजी करत आहे. तसेच वकिलाने, 'विमाने पोलंड आणि हंगेरी येथून चालवली जात आहेत, रोमानिया नाही. मुलींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी तेथे कोणत्याही सुविधांशिवाय अडकून पडले आहेत.' असे सांगितले त्या वर खंडपीठ, 'आम्हा सर्वांना त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, पण यात न्यायालय काय करू शकते?' असे सांगितले.

त्यानंतर सुप्रीम कोर्टाने अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांना सरकारशी बोलल्यानंतर अडकलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यास सांगितले. सरन्यायाधीशांनी वेणुगोपाल यांना सांगितले, “कृपया, तुमच्याकडून शक्य ती मदत करा. जनहित याचिका Attorney General यांच्या कार्यालयात पाठवली जाईल असे सांगीतले.

युक्रेनने आपली हवाई हद्द बंद केल्याने, भारताने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना युक्रेनच्या शेजारील देशांमधून पर्यायी मार्गाने बाहेर काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गुरुवारी सांगितले की, ऑपरेशन गंगा या मोहिमेअंतर्गत गुरुवारी बुखारेस्टहून आठ, Suceava येथून दोन, Kosice हून एक, बुडापेस्टहून पाच आणि Rzeszow येथून तीन फ्लाइटने 3,726 भारतीयांना भारतात परत आणले जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT