Indians In Russian Army Esakal
देश

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Russian Army: एजंटांनी विद्यार्थ्यांना फी माफी आणि व्हिसा वाढवून देण्याचे सांगत त्यांना सरकारी किंवा सार्वजनिक विद्यापीठांऐवजी रशियामधील संशयास्पद खाजगी विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवून दिले.

आशुतोष मसगौंडे

केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने नुकतेच रशिया-युक्रेन युद्धक्षेत्रात भारतीयांना पाठवणाऱ्या मानवी तस्करी प्रकरणी रशियन संरक्षण मंत्रालयात अनुवादक म्हणून काम करणाऱ्या कंत्राटी कामगारासह चार जणांना अटक केली. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

एजन्सीने मंगळवारी केरळमधील तिरुअनंतपुरम येथून रशियामध्ये भरतीसाठी पाठवणाऱ्यांमध्ये सहभागी असलेल्या अरुण आणि येसुदास ज्युनियर उर्फ ​​प्रियन यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या अन्य दोन आरोपींमध्ये, रशियाच्या संरक्षण मंत्रालयातील कंत्राटी कर्मचारी निजिल जॉबी बेन्सम आणि मुंबईतील रहिवासी अँथनी मायकेल एलांगोव्हन यांना 24 मे रोजी अटक करण्यात आली होती. (Human Trafficking Of Indians In Russian Army)

एका अधिकाऱ्याने सांगितले की, बेन्सम हा रशियामध्ये भारतीय नागरिकांना रशियन सैन्यात भरती करण्यासाठी कार्यरत असलेल्या नेटवर्कचा प्रमुख सदस्य होता.

निवेदनानुसार, अँथनी मायकल दुबईतील त्याचा सहआरोपी फैसल बाबा आणि रशियात राहणाऱ्या इतरांना चेन्नईतील व्हिसा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि पीडितांना रशियाला जाण्यासाठी विमान तिकीट बुक करण्यासाठी मदत करत होता.

अरुण आणि येसुदास जूनियर हे केरळ आणि तामिळनाडूमधील भारतीय नागरिकांची रशियन सैन्यात भरती करणारे मुख्य व्यक्ती होते.

सीबीआयने ट्रॅव्हल एजंट्सच्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला होता जी भारतीय तरुणांना रशियामध्ये चांगल्या नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवत होती परंतु नंतर त्यांचे पासपोर्ट जप्त करून त्यांना रशिया-युक्रेन युद्धक्षेत्रात ढकलत होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तपास यंत्रणेच्या एफआयआरमध्ये 17 व्हिसा सल्लागार कंपन्या, त्यांचे मालक आणि देशभरात पसरलेल्या एजंटांची नावे आहेत. एजन्सीने त्यांच्यावर गुन्हेगारी कट, फसवणूक आणि मानवी तस्करीशी संबंधित आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

सीबीआयने आरोप केला आहे की आरोपींनी त्यांच्या एजंट्सद्वारे भारतीय नागरिकांना रशियन सैन्यात, सुरक्षा रक्षक आणि पॅरामेडिक्समध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने रशियाला तस्करी करायचे आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले.

एजंटांनी विद्यार्थ्यांना फी माफी आणि व्हिसा वाढवून देण्याचे सांगत त्यांना सरकारी किंवा सार्वजनिक विद्यापीठांऐवजी रशियामधील संशयास्पद खाजगी विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवून दिले.

सीबीआयला अशी 35 प्रकरणे सापडली आहेत ज्यात इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्म, स्थानिक संपर्क आणि एजंटच्या माध्यमातून तरुणांना उच्च पगाराच्या नोकऱ्या देण्याचे खोटे आश्वासन देऊन रशियात नेण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT