Fighter Jet Aircraft esakal
देश

Fighter Aircraft : भारतीय बनावटीच्या 'तेजस'ला जगभरातून मागणी

सकाळ डिजिटल टीम

India-Argentina : अर्जेंटिनाने मेड इन इंडिया तेजस फायटर विमान खरेदी करण्यास तयारी दर्शवली आहे. अर्जेंटिनाआधी या विमानाबाबत बलाढ्य देश असलेल्या अमेरिकेनेदेखील रस दाखवला आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि फिलीपिन्ससह 6 देशांनी भारताच्या हलक्या लढाऊ विमान तेजसमध्ये स्वारस्य दाखवले आहे. तर मलेशिया हे विमान खरेदी करण्याची तयारी करत आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांचा नुकताच अर्जेंटिना दौरा पूर्ण झाला आहे. या दौऱ्यामध्ये अनेक गोष्टींबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

या दौऱ्यामध्ये अर्जेंटीना आणि भारतीय नेत्यामध्ये संरक्षण, अंतराळ आणि आण्विक समस्या, कृषी आणि पशुपालन व्यापार आणि गुंतवणूक यासह धोरणात्मक क्षेत्रांचा व्यापक आढावा घेण्यात आला. जयशंकर म्हणाले की, अर्जेंटिनाच्या राष्ट्रपतींनी द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यावर चर्चा केली, ज्यात व्यापार पातळी अधिक शाश्वत आणि महत्त्वाकांक्षी बनवण्याबाबत चर्चा झाली. त्यांनी ऊर्जा आणि अन्न सुरक्षा या विषयांवरही विचार विनिमय केला. यावेळी फार्मास्युटिकल्ससह परवडणाऱ्या आरोग्यसेवेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आल्याचे जयशंकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT