S Jaishankar chittagong port strengthen trade relations between India and Bangladesh Sheikh Hasina sakal
देश

चितगाव बंदराद्वारे जलवाहतूक होणार सुलभ

भारत व बांगलादेशातील व्यापारी संबंध बळकट होण्यास मदत; अन्य आशियाई देशांसाठी उपयुक्त

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : बांगलादेशमधील चितगाव बंदर भारतासाठी खुले केले आहे. परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या बैठकीत गेल्या महिन्यात यासंबंधीचा निर्णय झाला आहे. या बंदराद्वारे भारतातील ईशान्येकडील सात राज्यांशी जलमार्गाने संपर्क साधने शक्य होणार आहे. याच्या चाचण्या पूर्ण झाल्या असून एक महिन्यात सर्व प्रक्रिया मार्गी लागल्यानंतर भारतातून आता नियमितपणे मालवाहतूक सुरू होईल, असा विश्‍वास बांगलादेशचे सागरी वाहतूक मंत्री खालिद महमूद यांनी व्यक्त केला आहे. जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार सध्या भारतातून बांगलादेशात जाण्यासाठी एका ट्रकला १३८ तास कालावधी लागतो आणि परवानगीसाठी ५५ स्वाक्षरींची गरज असते. चितगाव बंदरामुळे वाहतूक सुलभ होणार आहे.

बंदरातून वाहतुकीचे महत्त्व

  • बांगलादेशबरोबर औद्योगिक आणि राजनैतिक संबंध दृढ होणार

  • ईशान्य भारतातील सात राज्यांसह म्यानम्यार, भूतान, नेपाळ यांसारख्या आशियाई देशांशी संबंधांना नवी दिशा मिळणार

  • बांगलादेशालाही मालवाहतुकीतून उत्पन्नाचा स्रोत निर्माण होणार

  • म्यानमार आणि बांगलादेशमध्ये क्षेत्रीय स्पर्धा आहे. खास करून औषध क्षेत्रात स्पर्धा असून म्यानमारवर लगाम घालण्यासाठी बांगलादेशकडून भारतासाठी जलमार्ग खुला

  • भारत -म्याममारमधील सितवे बंदर प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वी भारताबरोबर व्यापारी संबंध अधिक मजबूत करण्याचा बांगलादेशचा प्रयत्न

इतिहास

  • पोर्टो ग्रांडे डी बंगाल ः सोळाव्या शतकातील पोर्तुगाल साम्राज्यात चितगाव बंदर हे पोर्टो ग्रांडे डी बंगाल या नावाने ओळखले जात असे.

  • आसाम-बांगलादेश रेल्वे ःब्रिटिश राजवटीत आधुनिक चितगाव बंदर विकासासाठी आसाम-बांगलादेश रेल्वेची निर्मिती केली होती. दुसऱ्या महायुद्धात तत्कालीन ब्रह्मदेश मोहिमेत मित्र पक्षांच्या सैन्यासाठी हा रेल्वेमार्ग उपयुक्त ठरला होता.

अपेक्षा

  • बांगलादेशात पोहचलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून जगातील उत्पादन केंद्र अशी भारताची ओळख निर्माण होणार

  • संपर्काचे जाळे निर्माण झाल्यास भारतात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या आगामी काळात बांगलादेशातही प्रकल्प सुरु करू शकतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: 'जरांगे-पाटील यांच्याशी आमचा कवडीचा संबंध नाही'; शरद पवारांनी नाशिकमध्ये दिले स्पष्टीकरण

IND vs PAK : सूर्यकुमार यादव भाजपा प्रवक्ता... Asia Cup मध्ये लाज निघाल्यावर टीम इंडियाच्या कॅप्टनवर पाकिस्तानकडून नको ते आरोप; कोण म्हणतंय असं?

अरे हे चाललंय तरी काय! पुन्हा बदलली झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेची वेळ? नेटकऱ्यांनीच दाखवला फोटो

Sharad Pawar : ‘महाराष्ट्राची सामाजिक वीण विस्कटली’, आरक्षणावरुन शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Hug My Younger Self स्टाईलचा फोटो बनवा एका क्लिकवर..

SCROLL FOR NEXT