Subrahmanyam-Jaishankar 
देश

युक्रेन शेजारील देशांना परराष्ट्र मंत्र्यांचा फोन; भारतीय विद्यार्थ्यांना मदतीची केली विनंती

मोलदोवा आणि हंगेरीच्या परराष्ट्र मंत्र्यांना केला थेट फोन

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : युक्रेनमध्ये युद्धाला (Ukraine War) सुरुवात झाल्यानंतर तिथं अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. या विद्यार्थ्यांना आपल्या देशांमध्ये प्रवेश द्यावा यासाठी त्यांना सहकार्य करण्याचं आवाहन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S Jaishankar) यांनी त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांना थेट फोन करुन केली आहे. युक्रेनच्या सीमेवर सध्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठ्या समस्येला सामोर जावं लागत आहे. याचे अनेक धक्कादायक व्हिडिओ समोर आले आहेत. (S Jayshankar Discussions with Ukraine Neighboring Countries requested for help to Indian students)

भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी मोलदोवाचे परराष्ट्र मंत्री निकू पेपोस्कू यांना फोन केला असून युक्रेन-मोलदोवा सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना सुलभ प्रवेशासाठी मदत करण्याची विनंती केली. तसेच या विनंती तात्काळ प्रतिसाद दिल्याबद्दल आणि मजबूत पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रतिनिधी उद्या तिथे पोहोचतील, असंही जयशंकर यांनी त्यांना फोनवरुन सांगितलं.

दरम्यान, जयशंकर यांनी हंगेरीचे परराष्ट्र मंत्री पीटर त्सिझार्तो यांनाही फोन करुन हंगेरी-युक्रेन सीमेवरून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी पाठिंबा दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Threat : रणवीर सिंग नंतर आता सलमान खानच्या निकटवर्तीय अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी, कोट्यवधींची मागितली खंडणी

Khandala Crime: खंडाळा तालुक्यातील ‘त्या’ मृतदेहाचा खूनच; पुणे, साखरवाडीतून संशयित ताब्यात, तपासात धक्कादायक माहीती समाेर!

Satara Politics: सातारा जिल्ह्यात ‘सत्ता’खल! राष्‍ट्रवादी-शिवसेनेत खलबते; संजीवराजे ऑनफिल्‍ड, नेमकं काय ठरलं?

Maha Shivratri 2026 Rashifal: भगवान महादेवाच्या 'या' चार राशी आहेत प्रिय! महाशिवरात्रीला होऊ शकतो प्रचंड आर्थिक लाभ

मोठी बातमी! गुंठ्यावरील बांधकामांसाठी आता लगेच तात्पुरती मंजुरी अन् ‘ना-हरकत’ प्रमाणपत्रही; नगररचना विभागाचा आदेश, कोठे करायचा अर्ज? वाचा...

SCROLL FOR NEXT