S Jayshankar  Sakal
देश

मोदी पुन्हा चर्चेत; जयशंकर यांनी सांगितला 'त्या' मध्यरात्रीचा किस्सा

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात.

सकाळ डिजिटल टीम

S Jayshankar On Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. यावेळीदेखील मोदी पुन्हा एकदा चर्चेत आले असून, यावेळचा किस्सा स्वतःहा विदेश मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले आहे. 'Modi @ 20: Dreams Meet Delivery' या पुस्तकावरील चर्चेदरम्यान त्यांनी हा किस्सा सांगितला आहे.

मोदी बदल घडवून आणतील का? असा प्रश्न विचारला जातो. मात्र, मोदी स्वतः बदलाचे परिणाम आहेत. त्यांच्यासारखी व्यक्ती देशाची पंतप्रधान झाली आहे, यावरून देश किती बदलला आहे, हे लक्षात येते. असे जयशंकर म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी मोदींशी संबंधित एक संस्मरणीय किस्सा शेअर केला.

ते म्हणाले, ज्यावेळी तालिबानने अफगाणिस्तानवर हल्ला केला होता आणि तेथील भारतीय विद्यार्थ्यांना हाकलून देण्याची मोहीम सुरू होती. त्यावेळी मोदींनी मला मध्यरात्री फोन करत तुम्ही जागे आहात का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर मी हो असे उत्तर दिले. यानंतर पंतप्रधानांनी विचारले की, तुम्ही टीव्ही पाहत आहात का?, तिथे अफगाणिस्तानमध्ये काय चालले आहे? त्यावर थोड्याच वेळात मदत पोहोचत असल्याचे मी त्यांना सांगितल्याचे जयशंकर यांनी यावेळी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्यावेळी मदत पोहोचेल त्यावेळी मला फोन करण्यासही मोदींनी सांगितले. त्यावर मदत पोहोचण्यासाठी आणखी दोन ते तीन तास लागतीस असे मी सांगितले. त्यावर मोदींनी मोठ्या आवाजात नाही म्हणत मला थेट कॉल करण्यास सांगितले. पंतप्रधानांमधील हा अद्वितीय गुण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali Muhurat Trading : दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स-निफ्टी वधारले, अनेक शेअर्सनी गाठला ५२ आठवड्यांचा उच्चांक

Hinjewadi IT Park : जिथे रोज वाहनांच्या लांबच लांब रांगा, तिथे आता रस्ते मोकळे; दिवाळीच्या सुट्यांनी हिंजवडीतील वाहतुकीचे चित्र बदलले

Phaltan News: काळजाचा थरकाप उडवणारी घटना! आई-वडिलांसोबत झोपलेल्या तीन महिन्यांच्या चिमुकलीचा श्वानाच्या हल्ल्यात मृत्यू, नेमकं काय घडलं..

Latest Marathi News Live Update: : मंत्र्यांची अनोखी दिवाळी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंत्री उदय सामंत यांनी नांदेडमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी

Will Khashaba Jadhav get Padma Vibhushan in 2027? : खाशाबांना यंदा तरी पद्मविभूषण मिळणार का? 26 वर्षांचा लढा; राज्य सरकारचा केंद्राला प्रस्ताव, मुलाचीही न्यायालयात धाव

SCROLL FOR NEXT