S Jayshankar Sakal
देश

S Jaishankar: सोशल मीडिया हे दहशतवाद्यांचे महत्त्वाचे साधन, कट्टरतावादासाठी इंटरनेटचा वापर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत सोशल मीडियाच्या गैरवापरासंदर्भात वक्तव्य केलं आहे. "इंटरनेटचा वापर करून कट्टरतावाद आणि दहशतवाद पसरवला जात आहे" असं परराष्ट्र मंत्र्याने दहशतवाद्यांकडून सोशल मीडियाचा गैरवापर होत असल्याचं बोलताना सांगितलं.

(S Jaishankar In UNSC Meeting)

दरम्यान, संयुक्त राष्ट्राच्या दहशतवाद विरोधी समितीची बैठक दिल्लीत पार पडली. यामध्ये परराष्ट्र मंत्र्यांनी वाढत्या दहशतवादी कारवायांवर भाष्य करताना, दहशतवाद्यांकडून इंटरनेटचा, पैशांचा वापर करून कारवाया केल्या जात आहेत. तर इंटरनेट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे अतिरेक्यांसाठी महत्त्वाचे साधन बनले आहेत असं ते म्हणाले. त्याचबरोबर टेरर फंडिंगवरूनही त्यांनी बैठकीत सवाल उपस्थित केले आहेत.

दहशतवादाला विरोध करण्यासाठी भारताकडून पाच लाख डॉलर्सची मदत संयुक्त राष्ट्राच्या ट्रस्ट फंडमध्ये देण्यात येणार आहे अशी घोषणाही त्यांनी यावेळी बैठकीत बोलताना केली. त्याचबरोबर देशाच्या नवीन नियमामुळे आणि वाढत्या तंत्रज्ञानाने सरकारसमोर नवे आव्हान उभी राहिली आहेत असंही ते म्हणाले.

दरम्यान, मानवरहित हवाई यंत्रणेच्या अनियंत्रित वापरामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यावरही त्यांनी भाष्य केलं असून मानवरहित हवाई यंत्रणा उपलब्धतेत सुलभता असल्यामुळे दहशतवादी गटांकडून धोका बनला आहे असं जयशंकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT