Ashok Gehlot Sachin Pilot esakal
देश

Sachin Pilot : सचिन पायलटांनी काँग्रेस हायकमांडला पकडलं कोंडीत; पक्षाकडं उरला 'हा' शेवटचा पर्याय

राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या 5 तासांच्या उपोषणानं काँग्रेस हायकमांडची (Congress High Command) चांगलीच कोंडी झालीये.

Balkrishna Madhale

राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या 5 तासांच्या उपोषणानं काँग्रेस हायकमांडची (Congress High Command) चांगलीच कोंडी झालीये. हायकमांड पायलटांबाबत कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीये.

सुरुवातीला काँग्रेसचे प्रभारी रंधवा यांच्या वृत्तीनं पायलटांवर कारवाई होईल, असं वाटत होतं. मात्र, सध्या हे प्रकरण थंड झाल्याचं दिसतंय. कमलनाथ यांच्या एन्ट्रीनंतर सचिन पायलट यांची वृत्ती मवाळ झाल्याचं सांगण्यात येत आहे. राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) हस्तक्षेपामुळं पायलट यांना दिलासा मिळू शकतो. पायलट यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये हा पक्षासमोरचा शेवटचा उपाय आहे.

2020 च्या बंडानंतर यावेळीही सचिन पायलट यांना काँग्रेस हायकमांडकडून अभय मिळणार असल्याचं दिसतंय. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर कारवाई न केल्याबद्दल सचिन पायलट यांनी काँग्रेस पक्षावर सडकून टीका केलीये. पायलट म्हणाले, 'सीएम गेहलोत (CM Gehlot) यांना दोनदा पत्र लिहिलं, पण उत्तर मिळालं नाही.'

सचिन पायलट सध्या दिल्लीत आहेत. गुरुवारी रात्री कमलनाथ यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाल्याची चर्चा आहे. या बैठकीत सचिन पायलट यांनी हे उपोषण पक्षाच्या किंवा सरकारच्या विरोधात नसल्याचं सांगितलं आहे. वसुंधरा राजे सरकारच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली आणि काँग्रेसचं सरकारही स्थापन झालं, मात्र चार वर्षांत चौकशी झाली नाही, याची आठवण करून देण्यासाठी हा संदेश होता. भ्रष्टाचाराबाबत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना दीड वर्ष पत्रं लिहिली, पण उत्तर मिळालं नाही, असं त्यांनी सांगितल्याचं कळतंय.

सध्या सचिन पायलट 17 एप्रिलला दोन मोठ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जयपूरच्या शाहपुरा येथील परमानंद धामच्या कार्यक्रमाला पायलट पोहोचतील आणि त्यानंतर झुंझुनू येथील खाटडी इथं शहीद शेओराम यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे. राजस्थान काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सचिन पायलट सध्या दिल्लीत तैनात आहेत. त्यांनी रात्री उशिरा कमलनाथ आणि केसी वेणुगोपाल यांची भेट घेतली आणि दोघांसमोर आपली बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT