Ashok Gehlot vs Sachin Pilot esakal
देश

गेहलोतांची खेळी देणार सचिन पायलटांनां झटका; भंगणार मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न?

काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतरही गेलहलोत सांभाळू शकतात मुख्यमंत्रीपदाची खुर्ची

सकाळ डिजिटल टीम

जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेसच्या अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. यासाठी सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या आहेत, पण गेहलोत राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावर कायम राहण्याची जादू करु शकतात. त्यांच्या या खेळीमुळं मात्र सचिन पायलट यांचं मुख्यमंत्री होण्याच स्वप्न भंग होऊ शकतं. (Sachin Pilot dream of becoming CM of Rajstan would be broken due to Ashok Gehlot Politics)

राहुल गांधींनी काँग्रेसमध्ये 'एक व्यक्ती, एक पद' हा नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळं गेहलोत यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी सचिन पायलट यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. पण जर अशोक गेहलोत काँग्रेसचे अध्यक्ष बनले तर राज्यस्थानचा मुख्यमंत्री कोण असेल हे अंतिमतः काँग्रेस हायकमांडंच निश्चित करणार आहे. पण मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी गेहलोत सोनिया गांधी यांच्याकडे थोडा वेळ मागू शकतात. जर याला सोनिया गांधी राजी झाल्यातर गेहलोत मुख्यमंत्रीपद २०२३ पर्यंत लांबवू शकतात. कारण पुढील वर्षी राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक असले. आजच्या परिस्थितीत हे शक्य होऊ शकतं. कारण काँग्रेस पंजाबमधील चूक पुन्हा करणार नाही. पण यामुळं सचिन पायलट यांचं मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याचं स्वप्न भंग होऊ शकतं.

गेहलोत यांच्यावर काँग्रेस आपला निर्णय थोपवू शकणार नाही

अशोक गेहलोत आणि सचिन पायल यांची राजकीय उंची पाहिली तर गेहलोत पायलट यांच्यावर भारी पडू शकतात. राजकीय संकटकाळात गेहलोत यांनी अनेकदा सिद्ध केलंय की ते एक कुशल राजकारणी आहेत. ते गांधी कुटुंबियांच्या जवळचे आहेत तसेच काँग्रेस पक्षावर त्यांची मजबूत पकड आहे. त्यामुळं त्यांच्यावर काहीही थोपवलं जाऊ शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert: मुंबईत पावसाची रिपरिप सुरूच, पुढील काही दिवस अलर्ट जारी; हवामान विभागाची महत्त्वाची माहिती

आशीष शेलार आमच्या सोबत या! उद्धव ठाकरेंनी केलं शेलारांचे कौतुक, फडणवीसांना ठरवलं पप्पू?

६० व्या वाढदिवसाला शाहरुख मन्नतबाहेर आलाच नाही; पोस्ट करत सांगितलं कारण, म्हणाला, 'माफी मागतो पण...

अर्ध शरीर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा मदतीसाठी टाहो, बाजूला २० मृतदेह पडलेले; घटनास्थळी हादरवणारं दृश्य

Latest Marathi News Live Update : फलटनमध्ये पोलिस ठाण्यासमोर सुष्मा अंधारेचा ठिय्या

SCROLL FOR NEXT