sachin Sawant reaction on pm modi comment on attempt was made to suppress truth about Kashmir files  sakal
देश

"सत्य कोणी दाबले?...वाजपेयींनी? की ८ वर्षे सत्तेत असलेल्या मोदींनी?"

सकाळ डिजिटल टीम

सध्या विवेक अग्नहोत्री यांनी दिग्दर्शीत केलेल्या द काश्मिर फाइल्स (The Kashmir Files) या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. यावरून अनेक वादही निर्माण झाले आहेत. या चित्रपटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'सत्य दडपण्याचा प्रयत्न केला गेला अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर आता कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांना मोदी आणि भाजप (BJP) ला प्रतिप्रश्न केला आहे. 'सत्य कोणी दाबले? काय आहे सत्य?' असे थेट प्रश्न विचारले आहेत.

सचिन सावंत यांनी ट्वीटरवर एक पोस्ट केली असून यामध्ये त्यांनी पंतप्रधानांच्या व्हिडिओला प्रत्युत्तर दिलं आहे, त्यांनी प्रश्न विचारले आहेत की, सत्य कोणी दाबले? ६ वर्षे सत्तेत असलेल्या वाजपेयींनी? की ८ वर्षे सत्तेत असलेल्या मोदींनी?" त्यापुढे त्यांनी "काय आहे सत्य? असा प्रश्न विचारत दोन मुद्दे मांडले आहेत, पाहिला काश्मीरी पंडित विस्थापित होताना केंद्रात भाजपा समर्थित व्ही पी सिंग सरकार होते आणि दुसरा म्हणजे भाजप नियुक्त राज्यपाल जगमोहन यांनी पंडितांना संरक्षण देण्याऐवजी पळण्यास सांगितले, असा दावा सावंत यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रश्नांना भाजप काय उत्तर देईल ते पाहाण्यासारखे ठरेल.

दरम्यान सांवत यांनी उत्तर दिलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे, "कश्मीर फाईल्स चित्रपटाची चर्चा सुरु आहे, सध्या फ्रिडम ऑफ एक्सप्रेशन चा झेंडा घेऊन फिरणारे ती पुर्ण जमाक मागच्या पाच-सहा दिवसांपासून आस्वस्थ झाली आहे. त्याला मागे खेचण्यासाठी मोठी मोहीम चालवली जात आहे, यांची सत्य समजून घेण्याची किंवा ते स्विकारण्याची यांची तयारी नाही, हे जगाने पाहावे असे देखील यांना वाटत नाही त्यासाछी षडयंत्र केले जात आहे. ज्यांना वाटत चित्रपट ठिक नाही त्यांनी दुसरा चित्रपट बनवा, तुम्हाला कोण आडवतंय, बऱ्याच जणांना आश्चर्य वाटतंय की जे सत्य दाबून ठेवले ते बाहेर काढले जात आहे त्याला रोखण्यासठी प्रयत्न होतायत," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले

दरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, त्यांची पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी आणि चित्रपट निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. अभिषेक अग्रवाल यांनी सांगितलं की, पंतप्रधानांनी त्यांच्या चित्रपटाचं कौतुक केलं. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या भेटीचा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. द काश्मिर फाइल्स चित्रपटात अनुपम खेर, दर्शन कुमार आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT