Sachin Tendulkar. 
देश

मास्टर ब्लास्टरला रुग्णालयातून डिस्चार्ज; कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सुरु होते उपचार

सकाळ डिजिटल टीम

मास्टर ब्लास्टर अर्थात सचिन तेंडूलकर कोरोनाच्या संसर्गातून बरा होत असून गुरुवारी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर पुढील काही दिवस त्याला होम क्वारंटाइन रहावं लागणार आहे. २७ मार्च रोजी सचिन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. यानंतर त्याने ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली होती.

कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सहा दिवसांनंतर सचिनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर सचिननं ट्विट केलं होतं की, "आपल्या प्रार्थनेसाठी धन्यवाद! मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांनी घरी परतण्याची आशा आहे, सर्वांनी काळजी घ्या." 

गेल्या महिन्यात छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचं आयोजन करण्यात आलं होतं. या टुर्नामेंटमध्ये सचिन तेंडूलकरने इंडिया लिजन्ड्स या संघाचं नेतृत्व केलं होतं. या ठिकाणी श्रीलंकेवर मात केल्यानंतर मुंबईत परतलेला सचिन २७ मार्च रोजी कोरोना पॉझिटिव्ह झाला होता. 

याच दिवशी संध्याकाळी युसूफ पठाण याने आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं होतं. याच टुर्नामेंटमध्ये खेळणारे दोन खेळाडून इरफान पठाण आणि एस. बद्रीनाथ हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आले होते. सर्व क्रिकेटर्सने आपल्या सोशल मीडियावरुन याची घोषणा केली होती. तसेच स्वतःला घरातच क्वारंटाइन करुन घेणार असल्याचं सांगितलं होतं. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये कडक नियम लागू असतानाही स्टेडियम खचाखच भरलेलं असायचं यावेळी सोशल डिस्टंसिंग तर दूरच लोक मास्कही लावत नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B व्हिसावर ट्रंप प्रशासनाचा मोठा निर्णय; अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना बसणार मोठा फटका?

India vs Brazil Football: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ब्राझीलचा संघ जाहीर; व्हिनिशियस, राफीन्हा यांचीही ऐतिहासिक लढतीसाठी निवड

Maratha Reservation: ‘मुंबईला जाणारच’; १२ सप्टेंबरच्या बैठकीत कूचची तारीख ठरणार, मनोज जरांगेंचा निर्धार; भाऊबिजेला अमृता फडणवीसांच्या घरी जाणार

MPSC Exam: एमपीएससी परीक्षार्थींसाठी मोठी अपडेट; गट-क पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता ३ जानेवारीला होणार परीक्षा

Nagpur Weather: विदर्भाला उकाड्यापासून मिळणार दिलासा; शुक्रवारनंतर जोरदार पाऊस, तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT