Sadhana Gupta wife of Mulayam Singh Yadav passed away Sadhana Gupta wife of Mulayam Singh Yadav passed away
देश

मुलायम सिंह यादव यांची दुसरी पत्नी साधना गुप्ता यांचे निधन

सकाळ डिजिटल टीम

गुरुग्राम : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) संस्थापक मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचे शनिवारी (ता. ९) निधन झाले. साधना गुप्ता काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. साधना यांची प्रकृती चिंताजनक असल्याने आयसीयूमध्ये ठेवले होते. मात्र, शनिवारी सकाळपासून प्रकृती चिंताजनक होती. दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मागच्या आठवड्यापासून त्या शुगरसह विविध आजारांनी त्रस्त होत्या. मुलायम सिंह यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचे पार्थिव प्रथम दिल्ली आणि नंतर सैफई येथे नेण्यात येणार आहे. मुलायमसिंह यादव सध्या दिल्लीत आहे. त्यांचे पुत्र व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवही ही लखनौहून निघाले आहेत. काही वेळापूर्वी मुलायमसिंह यादव पत्नीला भेटण्यासाठी रुग्णालयातून गेले होते.

साधना गुप्ता या मुलायमसिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी असून, अखिलेश यादव (akhilesh yadav) यांच्या सावत्र आई आहेत. साधना यांच्या मुलाचे नाव प्रतीक यादव आणि सुनेचे नाव अपर्णा यादव आहे. साधना गुप्ता राजकारणापासून दूर राहिल्या. मुलायम सिंग यादव (Mulayam Singh Yadav) यांची पहिली पत्नी मालती यादव यांच्या निधनानंतर काही वर्षांनी साधना यांच्याशी लग्न केले होते. मुलायम सिंह यादवपेक्षा त्या २० वर्षांनी लहान होत्या. साधना गुप्ता या सार्वजनिक जीवनात पतीसोबत क्वचितच दिसल्या होत्या.

उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ‘माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांच्या निधनाची दु:खद बातमी मिळाली आहे. परमेश्वर पवित्र आत्म्याला त्यांच्या चरणी स्थान देवो. आदरणीय श्री मुलायम सिंह आणि कुटुंबीयांना दुःख सहन करण्याची शक्ती देवो! ओम शांती शांती शांती’ असे ट्विट मौर्य यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahabharat War: कसं घडलं महाभारातातील युद्ध? AI LIVE रिपोर्टींग VIRAL, ५१४२ वर्षे मागे जाल, साक्षात कृष्ण-अर्जुन सर्वांना पाहाल

शतकीय खेळीनंतरही यशस्वी जैस्वाल संघाबाहेर, तर आयुष्य म्हात्रेला संधी; रणजी सामन्यासाठी मुंबईचा संघ जाहीर...

Swabhimani Shetkari Sanghatana: 'कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक अडवली'; सोन्यासारख्या ऊसला कवडीमोल भाव; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

Nagpur News: सडकी सुपारी विक्रेत्यांच्या सिंडीकेटवर वार; गुन्हेशाखेची कारवाई, चार गोदामांवर छापा, ९० लाखांची सुपारी जप्त

Location Tracker : मोबाईलमधलं 'हे' App ट्रॅक करतंंय तुमचं लोकेशन? जाणून घ्या एका क्लिकवर..

SCROLL FOR NEXT