Sahara India  Esakal
देश

Sahara Refund Portal:सहारा इंडियामध्ये अडकलेला पैसा किती दिवसांत मिळणार? अशी आहे प्रक्रिया

Sahara India refund Process: सहारा इंडियामध्ये तुमचेही पैसे अडकलेत? परत मिळवण्यासाठी प्रक्रिया जाणून घ्या.

सकाळ डिजिटल टीम

Sahara India Refund Process:केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी मंगळवारी (दि.१८ जुलै) सहारा रिफंड पोर्टस लॉंच केलं. या पोर्टलच्या माध्यमातून सहारामध्ये पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे अडकलेले पैसे परत मिळतील.

देशाभरातील लाखो लोकांचे पैसे सहारा इंडियामध्ये अडकलेले आहेत. या पोर्टलच्या लॉंच होण्याने गुंतवणूकदारांच्या पैसे परत मिळण्याच्या आशा बळावल्या आहेत.

सहारा रिफंड पोर्टलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात अमित शाह म्हणाले की सहारा इंडियामध्ये ज्या लोकांचे पैसे अनेक वर्षांपासून अडकेले आहेत. अशा लोकांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली.

अमित शाह पोर्टल लॉंचच्या कार्यक्रमात म्हणाले की सुरुवातीच्या टप्प्यात जवळपास चार कोटी लोकांना याचा फायदा होणार. सहारा रिफंड पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने ५००० कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत मिळतील.

सहाराबद्दल बोलताना ते म्हणाले की अनेक वर्ष कोर्टात केस चालली होती. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गुंतवणूकदारांच्या हितासाठी या रिफंड पोर्टलच्या माध्यमातून पहिलं पाऊल उचललं.

ते म्हणाले की सुप्रिम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीशांनी गुंतवणूकदारांच्या समस्या समजून काम केलं, ही आमच्यासाठी गौरवाची गोष्ट आहे.

ज्या लोकांनी गुंतवणूक केली आहे, त्यांना पैसे परत मिळण्यापासून कोणीही अडवू शकतं नाही. ही खुप मोठी सुरुवात आहे, करोडो लोकांना त्यांची परिपक्व झालेली रक्कम परत मिळायला सुरुवात झालीये.

किती दिवसात परत मिळणार पैसे?

या रिफंड पोर्टलच्या माध्यमातून त्या गुंतवणूकदारांना पैसे परत मिळतील, ज्यांच्या गुंतवणूकीची मॅच्युरिटी पूर्ण झाली आहे. या पोर्टलवर आधी गुंतवणूकदाराला आपलं नाव नोंदवावं लागेल.

पडताळणी झाल्यानंतर पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल. गुंतवणूकदारांचे कागदपत्र सहारा समुहाकडून ३० दिवसांच्या आत पडताळणी केली जाईल.

त्यानंतर ऑनलाईन क्लेम दाखल करण्यासाठी १५ दिवसांच्या आत एसएमएसच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना सुचना दिल्या जातील. त्यानंतर गुंतवणूकदारांच्या खात्यात पैसे येतील.

रिफंड पोर्टल लॉंच झाल्यानंतर सहारा इंडियामध्ये गुंतवणूक केलेल्या १० कोटी लोकांसाठी ही आनंदाची बातमी होती.(Latest Marathi News)

ज्या गुंतवणूकदारांनी सहारामध्ये पैसे गुंतवले आहेत, त्यांना आधी चेक करावं लागेल की त्यांचा पैसा कोणत्या कोऑपरेटीव्हमध्ये लागला आहे. त्यानंतर त्यांना गुंतवणूकीसंबंधी कागदपत्र गोळा करावे लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT