Sahitya Akademi Award 2022 esakal
देश

Sahitya Akademi Award 2022 : प्रवीण बांदेकरांच्या 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' कादंबरीला साहित्य अकादमी

मुजूमदार यांना अनुवाद पुरस्कार

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली – साहित्य अकादमीच्या २०२२ साठीच्या वार्षीक साहित्य पुरस्कारासाठी मराठी व कोकणी या दोन्ही भाषांतील कादंबऱयांची निवड करण्यात आली आहे. प्रवीण दशरथ बांदेकर यांच्या `उजव्या सोंडेच्या बाहुल्या` ( प्रकाशन 2017)या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. कोकणीसाठी माया अनिल खर्नांगटे यांच्या अमृतवेल या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी १ लाख रूपये रोख, सन्मानचिन्ह व शाल असे पुरस्काराचे स्वरूप असून अकादमीच्या साहित्य अक्षरोत्सवात पुरस्कार प्रदान केले जातील.

दरम्यान प्रमोद मुजूमदार यांना काश्मीरबाबतच्या सलोख्याचे प्रदेश –शोध सहिष्णू भारताचा, या वरिष्ठ पत्रकार सबा नक्वी यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादासाठी अनुवाद पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत २३ भाषांतील साहित्यकृतींना अकादमी सन्मान देण्याचा निर्णय घेण्यात आला असे अकादमीचे सचिव डॉ के श्रीनिवास राव यांनी सांगितले.

यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये ७ काव्यसंग्रह, ६ कादंबऱया, २ कथासंग्रह, ३ नाटके, २ टीकात्मक पुस्तके, प्रत्येकी १ आत्मकथन, लेखसंग्रह व एतिहासिक कथासंग्रहाची निवड करण्यात आल्याचेही डॉ राव यांनी सांगितले. ज्येष्ठ साहित्यिक भआलचंद्र नेमाडे, ज्येष्ठ संपादक व खासदार कुमार केतकर आणि प्रा. नितीन रिंढे यांच्या निवड समितीने यंदाच्या मराठी साहित्यकृतीची निवड या पुरस्कारसाठी केली.

यंदा इंग्रजीसाठी अनुराधा रॉय यांच्या – आल द लाईव्हज व्हेनेव्हर लिव्हड या पुस्तकाची, तर हिंदीसाठी थुमाडी के शब्द या बद्रीनारायण यांच्या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. साहित्य अकादमीचा बंगालीसाठीचा तर कोकणी व हिंदीसह ७ भाषांसाठीचे अनुवाद पुरस्कार नंतर जाहीर केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK :'हस्तांदोलन' न करणे हा भारताने सुरू केलेला मुर्खपणा! Sanjay Manjrekar यांची वादग्रस्त पोस्ट; काहींचा सपोर्ट, तर काही विरोधात; तुमचं काय मत?

Education: अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षणात मूलभूत सुधारणेसाठी तरतूद करा; महायुती सरकारकडे शिफारस

अनैसर्गिक शरीर संबंध, व्हिडिओ बनवला अन्...; ९ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं १२ वर्षीय मुलासोबत नको ते कृत्य, घटनेनं संताप

Latest Marathi News Live Update : पालघरच्या एमआयडीसीत कंटेनर कंपनीला भीषण आग

Railway Accident: रुळावर होणारे अपघात टळणार, रेल्वेचा मोठा निर्णय, ११९ कोटींचा प्रकल्प हाती; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT