मिर्झापूर - बजरंग दल आणि विहिंपच्या वतीने रामजन्मभूमि कार्यक्रमासाठी गंगा नदीतील पाणी आणि वाळू  एका कलशात गोळा करण्यात आले.
मिर्झापूर - बजरंग दल आणि विहिंपच्या वतीने रामजन्मभूमि कार्यक्रमासाठी गंगा नदीतील पाणी आणि वाळू एका कलशात गोळा करण्यात आले. 
देश

रामजन्मभूमी पूजनासाठी संत महात्मे होणार सहभागी; अशी असेल तयारी

पी. बी. सिंह

अयोध्या - राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रम भव्य स्वरूपात करण्यासाठी जय्यत तयार सुरू असून यात आयोजनात बदल करण्यात आला आहे. भूमिपूजनाला उपस्थित राहणारे संत- महात्मे आणि अन्य प्रमुख व्यक्तींसाठी बैठकीसाठी कार्यक्रमस्थळी दोन मांडव उभारण्यात येणार आहेत. यामुळे तेथे आता सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित केले जाणारे प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कार्यक्रमस्थळी ६०० पाहुण्यांच्या बैठकीची व्यवस्था असेल. सुरक्षित अंतराचा नियम पाळत मांडवात खुर्च्या ठेवण्यात येणार आहे. भूमिपूजन कार्यक्रमासाठी आधी केवळ २०० लोकांची व्यवस्था होती. विविध आखाडे, मठ व मंदिरांच्या संत-महात्म्यांना या कार्यक्रमात सहभागी होता येणार नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अशा प्रकारे उपेक्षा केली जात असल्याची तक्रार त्यांनी केल्यानेच नियोजनात बदल करण्यात आला आहे.

भूमिपूजनासाठी...

  • छोटे व्यासपीठ उभारणार.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत आदींची व्यासपीठावर उपस्थिती.
  • मोदी सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी येणार. 
  • आगमनानंतर प्रथम अस्थायी मंदिरात दर्शन करणार. हनुमान गढीला भेट देऊन नंतर आयोजन स्थळी पोचतील.
  • घाटांवर व मंदिरात दीपोत्सव साजरा करणार.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT