saji cherian sakal
देश

केरळचे मंत्री चेरियन अखेर पायउतार

राज्यघटनेच्या विरोधातील टिप्पणी विधानसभेत गदारोळ

अजय कुमार

तिरुअनंतपुरम : राज्यघटनेविरोधात टिप्पणीमुळे टीकेचे धनी झालेले केरळचे मत्स्यपालन व सांस्कृतिक मंत्री साजी चेरियन यांनी बुधवारी सायंकाळी मंत्रीपदावरून पायउतार झाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाने दिलेल्या आदेशानुसार मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याकडे त्यांनी राजीनामापत्र सोपविले. पत्रकार परिषदेत चेरियन म्हणाले, की, मल्लपल्ला येथे रविवारी (ता.३) झालेल्या पक्षाच्या बैठकीत मी काही मुद्दे मांडले होते. राज्यघटनेविषयी मला पूर्ण आदर आहे. याबाबत मी विधानसभेत म्हणणे मांडले आहे.

मुख्यमंत्र्यांनी ॲडव्होकेट जनरलकडून कायदेशीर सल्ला घेतला आहे. माध्यमांनी माझ्या भाषणाचा चुकीचा अर्थ लावला. चेरियन यांच्या राज्यघटनेविरोधात टिप्पणीवरून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीने (यूडीएफ) विधानसभेत आज सकाळी गोंधळ घातला.

राज्यपालांची भेट

चेरियन यांचे भाषण प्रसारित झाल्यानंतर काल विरोधी पक्षांनी काल निषेध आंदोलन केले. मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल अरिफ महंमद खान यांना भेटून केली. काँग्रेस नेत्यांनीही राज्यपालांची भेट घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harmanpreet Kaur : आम्ही करून दाखवलं, जेमिमाने तर...! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर काय म्हणाली कर्णधार हरमनप्रीत कौर?

Beed Crime : बीडमध्ये चाललंय काय? दारू सुटावी म्हणून व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले अन् सकाळी झाला मृत्यू; अंगावर मारहाणीचे वळ

Panchang 31 October 2025: आजच्या दिवशी पांडुरंगाष्टक स्तोत्राचे पठण आणि ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

Kolhapur Smshanbhoomi Viral Video : ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीत कन्नड संभाषण,'भूत बाटलीत बंद केलंय'; फोटो आणि व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Top 5 Countries: परदेशात शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करा! हे आहेत 5 देश, जिथे भारतीय विद्यार्थी 30 लाखांच्या आत करू शकतात उच्च शिक्षण

SCROLL FOR NEXT