देश

‘ॲग्रोवन'ला राष्ट्रीय जल पुरस्कार; माध्यम श्रेणीत दुसरा क्रमांक

‘जल'जागृती करणाऱ्या ‘सकाळ ॲॅग्रोवन'ला तिसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्काराने गौरविण्यात आले

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : जलसंधारणापासून ते हवामान बदलापर्यंत विविध विषयांवर ‘जल'जागृती करणाऱ्या ‘सकाळ ॲॅग्रोवन'ला तिसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्काराने गौरविण्यात आले. अॅग्रोवनचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांनी हा पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या २०२० साठीच्या विविध श्रेणीतील राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा गेल्या महिन्यात करण्यात आली होती. 'सर्वोत्कृष्ट माध्यम (मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक) या गटात सकाळ माध्यम समूहाच्या 'ॲग्रोवन'ला राष्ट्रीय पातळीवर दुसरा क्रमांक मिळाला. सर्वोत्कृष्ट राज्य श्रेणीमध्ये उत्तर प्रदेशला प्रथम, राजस्थानला द्वितीय आणि तामिळनाडूला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

जलसंपदा व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी जलसंपदा, नदीविकास आणि गंगा पुनरुत्थान, जलशक्ती मंत्रालय यांच्याकडून विविध राज्ये, संस्था, व्यक्ती आदींना ११ विविध श्रेणींमध्ये ५७ पुरस्कार दिले जातात. सर्वोत्कृष्ट राज्य, सर्वोत्कृष्ट जिल्हा, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत, सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था, सर्वोत्कृष्ट माध्यम (मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक), सर्वोत्कृष्ट शाळा, सर्वोत्कृष्ट संस्था, धार्मिक संस्था, सर्वोत्कृष्ट उद्योग, सर्वोत्कृष्ट स्वयंसेवी संस्था, सर्वोत्कृष्ट पाणी वापर संस्था आणि औद्योगिक सामाजिक दायित्व या श्रेणीत सर्वोत्तम उद्योग अशा विविध श्रेणींचा यात समावेश आहे. यापैकी काही श्रेणींमध्ये देशाच्या वेगवेगळ्या विभागांसाठी उपश्रेणी देखील आहेत. प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT