akhilesh yadav samajwadi party esakal
देश

समाजवादी पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित; शिवपाल यादव यांच्याकडे मोठी जबाबदारी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः समाजवादी पार्टीने आपली राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित केली आहे. या कार्यकारिणीमध्ये एकूण ४२ जणांचा समावेश करण्यात आलाय. आज जाहीर करण्यात आलेल्या नावांमध्ये शिवपाल यादव यांनादेखील मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे.

यासोबतच आजम खान आणि 'रामचरितमानस'वरुन वाद उभा करणारे स्वामी प्रसाद मौर्य यांनाही कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. माहितीनुसार शिवपाल यादव यांनी मैनपुरीमध्ये डिंपल यादव यांच्या विजयासाठी मेहनत घेतली होती. त्याचंच त्यांना फळ मिळाल्याचं सांगण्यात येतंय.

समाजवादी पक्षाकडून शिवपाल यादव, आझम खान, आणि स्वामी प्रसाद मौर्य यांना राष्ट्रीय महासचिव म्हणून नियुक्त केलं आहे. तर अखिलेश यादव पु्हा एकदा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आहेत. किरनमय नंदा यांच्याकडे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि रामगोपाल यादव यांच्याकडे राष्ट्रीय प्रमुख महासचिव म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे.

समाजवादी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये अखिलेश यादव, किरनमय नंदा, रामगोपाल यादव, मोहम्मद आझम खाँ, शिवपाल सिंह यादव, रवी प्रकाश वर्मा, बलराम यादव, स्वामी प्रसाद मौर्या, विश्वंभर प्रसाद निषाद, अवधेश प्रसाद, इंद्रजीत सरोज, रामजीलाल सुमन, लालजी वर्मा यांच्यासह ३२ जणांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT