Sambit-Patra
Sambit-Patra Sakal
देश

काँग्रेसने देशाची माफी मागावी; भाजपची मागणी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : २००८च्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी एका साक्षीदाराच्या कबुली जबाबाने भाजपने काँग्रेसवर (BJP And Congress) टीका केली आहे. काँग्रेसने देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजप आणि संघ परिवाराने आज केली. या प्रकरणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना गोवण्याचे कारस्थान काँग्रेसच्या काळात रचले गेले, असा आरोप भाजपने केला.

मालेगाव स्फोटांबाबत (Malegaon Blast) जबाब नोंदवण्यात आलेल्या २२० पैकी १५ साक्षीदार उलटले आहेत. त्यातील एका जणाच्या ताज्या जबाबानंतर संघ आणि भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. या प्रकरणात खासदार प्रज्ञासिंह ठाकुर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, सुधाकर द्विवेदी, मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय रहीरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी व समीर कुलकर्णी आरोपी आहेत हे सध्या जामिनावर सुटले आहेत.

भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्यावर विभाजनकारी राजकारण केल्याचा आरोप केला. पात्रा म्हणाले की काँग्रेसच्या मनात 'भगव्या'विषयी कायमच द्वेषाची भावना असते हे लपून राहिलेले नाही. भगवा रंग जेथे जेथे दिसेल तेथे तेथे त्याची बदनामी करण्यासाठी काँग्रेस कोणत्याही थराला जाऊ शकते हे मालेगाव प्रकरणातील कबुली जवाबाने समोर आले आहे. मालेगाव स्फोटातील एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांने राष्ट्रीय तपास संस्थेला दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात योगी आदित्यनाथ आणि संघ तसेच भाजपच्या नेत्यांना अडकवण्याचे कारस्थान करण्यात आले होते.

इंद्रेशकुमार यांची काँग्रेसवर टीका

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते, मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे प्रमुख इंद्रेश कुमार यांनी, भगवा दहशतवाद हा यूपीए सरकारच्या काळात प्रचलित झालेला शब्द संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना बदनाम करण्यासाठी आणि त्यांचा छळ करण्यासाठी वापरण्यात आला, असा आरोप केला. तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्यासह पी. चिदंबरम, राहुल गांधी, प्रियंका गांधी, दिग्विजय सिंह, सलमान खुर्शीद यांनी माफी मागावी. हे सर्व हिंदू समाजाचे दोषी आहेत. संघाच्या आणि भाजपला बदनाम करण्याच्या राजकारणातील ते सहभागी आहेत, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT