Sambit Patra Sakal
देश

"जरा तरी लाजा बाळगा"; संबित पात्राच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

प्रचारादरम्यानच्या या भोजनाचे फोटो संबित पात्रा यांनी आपल्या ट्वीटरवर शेअर केले होते.

दत्ता लवांडे

देशातील पाच राज्यांतील निवडणुकांची रणधुमाळी चलू आहे. गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी हे मतदान होणार असून गोवा राज्यातील मतदान झालेले आहे. त्याचबरोबर उत्तरप्रदेशमधील मतदान हे सात टप्यात होणार असून पाच टप्प्यातील मतदान झालेले आहे. तसेच मणिपूरमधील मतदान दोन टप्प्यात होणार असून २८ फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान झाले असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान पाच मार्चला होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे.

सध्या मणिपूरमध्ये भाजपाचा प्रचार करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गेलेले आहेत. त्यांच्यासोबत भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रासुद्धा प्रचाराच्या ताफ्यात आहेत. काल (ता. १) त्यांनी भाजपाच्या एका उमेदवाराच्या घरी जेवन केलं होतं. त्यावेळी भाजपाचे उमेदवार, अमित शहा, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा, मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग, थौबल येथील भाजपाचे उमेदवार शाम सिंग, अशोक सिंघल आणि बिस्वजित थोंगम हे उपस्थित होते.

प्रचारादरम्यानच्या या भोजनाचे फोटो संबित पात्रा यांनी आपल्या ट्वीटरवर शेअर केले होते. त्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे. सध्या देशात काय परिस्थिती चालू आहे आणि तुम्ही तिकडे पार्टी करताय. अशा संतप्त प्रक्रिया लोकांकडून उमटत आहेत. संबित पात्रा यांच्या ट्वीट ला रिप्लाय करताना श्याम सिंग या व्यक्तीने म्हटलंय की, "युक्रेनमध्ये नवीन नावाच्या भारतीय विद्यार्थ्याचा बॉम्बहल्ल्यात मृत्यू झाला आहे. आपले लोकं मारले जात आहेत. तिकडे तहानभूकेने आपले विद्यार्थी मरत आहेत आणि तुम्ही तिकडे पार्ट्या करता. जरा लाजा बाळगा." अशी संतप्त प्रतिक्रिया यांनी व्यक्त केली आहे.

त्याचबरोबर "रशियाचे युक्रेनवरील हल्ले दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत या काळात तरी जरा तुम्हाला लाज वाटली पाहिजे. देशातील विद्यार्थांना आणि नागरिकांना बाहेर काढण्याऐवजी तुम्ही फोटो पोस्ट करत आहात. यासारखे फोटो पोस्ट करुन तुम्ही काय साध्य करणार आहात?" अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांमध्ये उमटत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today: शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! TCS-Infosys शेअर्सची स्थिती काय? टॉप गेनर्स कोण?

SCROLL FOR NEXT