Samir Dwivedi, son of senior Congress leader Janardan Dwivedi to join BJP 
देश

काँग्रेसला धक्का; दिग्गज नेत्याच्या मुलानेच केला भाजपमध्ये प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : राष्ट्रीय काँग्रेसला मोठा धक्का बसला असून काँग्रेसच्या दिग्गज नेत्याच्या मुलाने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी यांचे चिरंजीव समीर द्विवेदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जनार्दन द्विवेदी यांनी बोलताना मुलाने घेतलेल्या निर्णयाची कुठलीही कल्पना नसल्याचे सांगितले आहे. मुलाने घेतलेला निर्णय हा त्याचा वैयक्तिक निर्णय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

जनार्दन द्विवेदी हे काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत. सोनिया गांधींचे ते निकटवर्तीय मानले जायचे. मात्र सध्या काँग्रेसमधील त्यांचे स्थान पूर्वीसारखे नाही. जनार्दन द्विवेदी यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केल्यापासून पक्षातील त्यांचे महत्त्व कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

द्विवेदी यांनी मोदींचे कौतुक करताना मोदी हे भारतीयांच्या जवळचे नेते बनले असून मोदींचा विजय हा भारतीयांचा विजय असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेतृत्व नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. अशातच आता त्यांचा मुलगा भाजपवासी झाल्याने काँग्रेस नेतृत्व आणि द्विवेदी यांच्यातील दी आणखीनच वाढेल असा अंदाज बांधण्यात येत  आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WhatsApp New Update : व्हॉट्सॲपने बदलली फोटो-व्हिडिओ पाठवायची पद्धत! आता आलंय नवीन फीचर, पाहा कसं वापरायचं?

इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले! मुंबईत भाजीपाला, दूध आणि प्रवास महागला; घरखर्चात मोठी वाढ

MI vs RR: वैभव सूर्यवंशी, पराग फेल; पण जडेजाचा फिनिशिंग टच अन् राजस्थान रॉयल्स २०० धावा पार; मात्र मुंबई इंडियन्स करणार गेम?

Fuel Crisis: पेट्रोल-डिझेलसोबत आता CNG-LNG डिस्पेंसर तपासणी व्यवस्था बदलणार! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; नवे नियम लागू

Ratnagiri Crime News : ‘तू त्याचा नाद सोडून दे,’ असा सल्ला मैत्रिणीला दिला अन्, सोहम कट रचून सूरजचा काढला काटा

SCROLL FOR NEXT