Sammed Shikhar sakal
देश

Sammed Shikhar : ‘सम्मेद शिखर' देवस्थान प्रकरण; केंद्र सरकारने आपली पावले घेतली मागे

झारखंडमधील ‘सम्मेद शिखर' देवस्थानाला पर्यटन स्थळाचा दर्जा दिल्याने नाराज झालेल्या जैन समाजाच्या देशव्यापी व तीव्र विरोधानंतर केंद्र सरकारने आपली पावले मागे घेतली आहेत.

मंगेश वैशंपायन

झारखंडमधील ‘सम्मेद शिखर' देवस्थानाला पर्यटन स्थळाचा दर्जा दिल्याने नाराज झालेल्या जैन समाजाच्या देशव्यापी व तीव्र विरोधानंतर केंद्र सरकारने आपली पावले मागे घेतली आहेत.

नवी दिल्ली - झारखंडमधील ‘सम्मेद शिखर' देवस्थानाला पर्यटन स्थळाचा दर्जा दिल्याने नाराज झालेल्या जैन समाजाच्या देशव्यापी व तीव्र विरोधानंतर केंद्र सरकारने आपली पावले मागे घेतली आहेत सरकारच्या आवाहनानंतर केंद्र सरकारने या टिकाणाला पर्यटन स्थळ म्हणून मान्यता देणाऱया अधिसूचनेचा काही भाग आज रद्द केला आहे.

या मुद्द्यावर जैन समाजाच्या तीव्र निषेधानंतर केंद्र सरकारने पारसनाथ टेकडीवर (जिथे सम्मेद शिखर देवस्थान आहे) सर्व वादग्रस्त उपक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह राज्यातील सर्व धार्मिक स्थळांवर दारू पिण्यास बंदी घालण्यात आली आहे.

सम्मेद शिखरबाबतच्या विरोधानंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून २०१९ च्या अधिसूचनेत योग्य बदल करण्याची विनंती केली होती. २०२१ मधील राज्याच्या पर्यटन धोरणात या तीर्थक्षेत्राच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी व्यवस्थापन मंडळ स्थापन करण्याची तरतूद होती,असेही त्यांनी लिहिले होते.

सम्मेद शिखरावरील पारसनाथ मंदिर असलेल्या पारसनाथ डोंगराला ‘इको-टुरिझम' क्षेत्र म्हणून घोषित करण्यास संपूर्ण देशातील जैन समाजाचा तीव्र विरोध झाला होता.

दरम्यान सम्मेद शिखर च्या मुद्यावर पालीताना जैन तीर्थक्षेत्राच्या प्रमुख विश्वस्तांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांची आज दिल्लीत भेट घेतली. त्यांनी सांगितले की केंद्रीय मंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर सर्व शंका दूर झाल्या आहेत. आमची मागणी मान्य करण्यात आली आहे.

पारसनाथ पर्वतीय प्रदेशात यांना बंदी राहणार -

- अंमली पदार्थ व ‘सर्व मादक पदार्थां‘ची विक्री व सेवन.

- मोठ्या आवाजात संगीत वाजवणे.

- लाऊडस्पीकर वापरणे.

- निसर्गाला हानी पोहोचविणारे कृत्य करणे

- पाळीव प्राणी आणणे.

- ट्रेकिंगला परवानगी देणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT