Madras High Court esakal
देश

Sanatan Dharma Row: भाषण स्वातंत्र्य 'हेटस्पीच' होता कामा नये; 'सनातन वादा'वर हायकोर्टाची टिप्पणी

तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी नुकत्याच केलेल्या टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टानं ही टिप्पणी केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

चेन्नई : सनातन धर्मावर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हेटस्पीच होता कामा नये, असं विधान हायकोर्टानं केलं आहे. पण यावेळी कोर्टानं सनातन धर्म काय आहे, हे देखील सांगितलं. न्या. एन. शेषशायी यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली आहे. (Sanatan Dharma Row Freedom of expression should not be hate speech Madras High Court)

कोर्टानं सांगितलं 'सनानत धर्म' काय?

न्यायमूर्तीं पुढे म्हणाले की, सनातन धर्म हा शाश्वत कर्तव्यांचा समूह आहे. ज्यामध्ये राष्ट्र, राजा, आई-वडील आणि गुरूंप्रती कर्तव्य आणि गरिबांची काळजी घेणे यासह इतर कर्तव्यांचा समावेश आहे. भाषण स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार असला तरी, तो द्वेषयुक्त भाषणात बदलू नये. विशेषत: जेव्हा आपलं विधान धर्माशी संबंधित असेल. अशा भाषणानं कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं आहे. (Latest Marathi News)

सनातनच्या तत्वांना आता जागा नाही

"समान नागरिक असलेल्या देशात अस्पृश्यता खपवून घेतली जाऊ शकत नाही," न्यायमूर्ती शेषशायी म्हणाले. "अस्पृश्यता पाळण्याबाबत सनातन धर्माच्या तत्त्वांमध्ये कुठेतरी परवानगी असली तरी, आता या तत्वांना समाजात जागा मिळू शकत नाही, कारण घटनेच्या कलम 17 नं अस्पृश्यता नाहीशी केली आहे" (Marathi Tajya Batmya)

हेटस्पीच नको

कोर्टानं म्हटलं, "प्रत्येक धर्म श्रद्धेवर आधारित आहे आणि स्वभावतःच श्रद्धा आंधळी असते" "म्हणून, जेव्हा धर्माशी संबंधित बाबींमध्ये भाषण स्वातंत्र्य वापरलं जातं, तेव्हा कोणीही दुखावला जाणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणजेच दुसऱ्या शब्दांत, भाषण स्वातंत्र्य द्वेषयुक्त भाषण असू शकत नाही"

स्टॅलिन यांनी केलं होतं वादग्रस्त विधान

तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविरोधात नुकत्याच केलेल्या टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टानं ही टिप्पणी केली आहे. त्यांनी सनातन धर्माला 'डेंग्यू आणि मलेरिया' सारख्या रोगांची उपमा दिली होती. त्यामुळं त्यांना या घटनेनंतर मोठ्या टीकेला समोरं जावं लागलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT