Sandalwood sakal media
देश

देशातील मोठा चंदन तस्कर बादशाह मलिकला अटक; इडीची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देशातला मोठा चंदन तस्कर (Sandalwood smuggler) म्हणून ओळख असलेल्या बादशाह मलिकला (Badshah Malik arrested) इडीनं (enforcement Directorate) अटक केली आहे. कुर्ला इथल्या त्याच्या घरावर इडीनं सोमवारी छापा (Ed raids at home) मारला होता, त्यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन रात्री त्याला अटक करण्यात आली़.

बादशाह मलिक हा अंडरवर्ल्डसोबत मिळून जगभरात लाल चंदनाची तस्करी करत असल्याची माहिती आहे. चंदन तस्करीच्या 2015 सालच्या प्रकरणाशी संबंधीत ही कारवाई असल्याचं बोललं जात आहे. 2015 मध्ये डिआरआयनं एक रॅकेट उद्ध्वस्त केलं होतं. ज्यात अतिशय दुर्मिळ आणि महाग असलेलं लाल चंदन तस्करी करुन परदेशात पाठवण्यात येत होतं.

मुंबईच्या एका शिपींग कंपनीच्या माध्यमातून जवळपास 8000 मेट्रीक टनाहून अधिक लाल चंदनाची तस्करी करण्यात येत होती. त्याची तेव्हाची किंमत 3 कोटींपेक्षा जास्त होती. डिआरआयनं न्हावाशेवा बंदरावर कंटेनरला ऱोखून ही तस्करी थांबवली होती. यातच बादशाह मलिक आणि विजय पुजारीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याआधी दोन वेळा बादशाह मलिकला अटक करण्यात आली होती, पण काही दिवसांतच तो जामिनावर बाहेर येतो, आणि पुन्हा तस्करी करायला सुरुवात करतो, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच धडक, घिरट्या घालत अचानक जमिनीवर कोसळले; घटनेचा धक्कादायक VIDEO समोर

Aadhaar Updates : UIDAI च्या नवीन सूचना! आधार कार्ड स्कॅमपासून वाचण्यासाठी करा ही 5 कामे

Panhala Forest Ban : पन्हाळ्यातील वनक्षेत्रात पर्यटकांना नो-एन्ट्री! 'या' तारखेपर्यंत वन विभागाकडून नाकाबंदी, काय आहे कारण?

Latest Marathi News Live Update : नागपुरमध्ये भाजप उमेदवारांची यादी उद्या जाहीर होणार

Jalgaon Municipal Election : जळगावात युतीची गाडी घसरली? जागावाटपावरून खडाजंगी, गुलाबराव पाटील तावातावात बाहेर!

SCROLL FOR NEXT