sandip maheshwari 
देश

'संदीप माहेश्वरी माफी मांगो'; संस्कृतवरून ओढवून घेतला वाद

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - भारतात शालेय अभ्यासक्रमामध्ये भाषा विषय शिकवले जातात. यामध्ये मातृभाषेचा समावेश आहे. याशिवाय संस्कृतसारख्या दररोज बोलल्या न जाणाऱ्या भाषाही आहेत. यावर वादग्रस्त कमेंट केल्यानंतर मोटिव्हेशनल स्पिकर संदीप माहेश्वरीविरोधात ट्विटरवर ट्रेंड सुरु झाला आहे. यामध्ये संदीप माहेश्वरीने माफी मागावी अशी मागणी करण्यात येत आहे. ज्या भाषा बोलल्या जात नाहीत त्यांचा अभ्यास करून दबाव का घ्यायचा असं सांगताना संदीप माहेश्वरींनी केलेलं वक्तव्य आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. 

मला कोणाशी संस्कृतमध्ये बोलायचं नाहीय. संस्कृतमध्ये जी काही पुस्तकं लिहिण्यात आली आहेत ती आता हिंदी आणि इंग्लिशमध्ये भाषांतर झाली आहेत. तर मी हिंदी किंवा इंग्लिशमधे वाचेन. जबरदस्तीने संस्कृत का शिकवत आहात? म्हणून संस्कृत हद्दपार केलं जावं. त्यामुळे असलेला दबाव कमी होईल. विचार करा तुम्ही संस्कृत, फ्रेंच शिकवत आहात. त्यात पुन्हा वेगळे क्लास घेत आहात. एवढं करूनही त्याचा काही वापर केला जात नाही. तुमच्या आई-वडिलांना कधी पाहिलं आहे का संस्कृतमध्ये बोलताना? त्वम किम करिश्यामी? अहम खाना बनस्यामी 

संदीप माहेश्वरी यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ट्विटरवर त्यांनी माफी मागावी असा ट्रेंड सुरु झाला आहे. संदीप माहेश्वरी यांचं हे वक्तव्य मुर्खपणा असल्याचं युजर्सनी म्हटलं आहे. एका युजरनं म्हटलं की, चर्चा कशावरही असली तरी तुम्ही संस्कृत भाषेची खिल्ली उडवू शकत नाही. आपण गणितातील त्रिकोणमितीसारखी प्रकरणं फक्त शिकतो त्याचा दररोजच्या जीवनात वापर करत नाही. याचा अर्थ असा नाही की आपण अभ्याक्रमातून ते काढून टाकावं. 

दरम्यान, काही युजर्सनी संदीप माहेश्वरींनी माफी मागण्याची गरज नाही असंही म्हटलं आहे. त्यांचा पूर्ण व्हिडिओ न पाहता कोणत्याही प्रकारचे आरोप कऱणं चुकीचं आहे असं म्हणत युजरने पूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे. 

संस्कृत ही देवांची भाषा आहे. सर्व भाषांची निर्मिती यातूनच झाल्याचं म्हटलं जातं. फक्त संस्कृत व्याकरण शिकून भारतीय भाषा शिकता येतात. संदीप माहेश्वरींचा आदर आहे पण त्यांनी जे म्हटलं ते कधीच स्वीकारता येणार नाही असं एका युजरनं म्हटलं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT