Sangoli Rayna Society Scam 41 lakhs vehicles seized 
देश

संगोळी रायान्ना सोसायटी अपहारप्रकरण ; 41 लाखांची वाहने जप्त

संजय सूर्यवंशी

बेळगाव : हनुमाननगर येथील आनंद अप्पुगोळ यांच्या बंगल्याच्या परिसरात लावलेली 33 वाहने आज पोलिसांनी जप्त केली. यामध्ये 3 मोटारी व 30 दुचाकी वाहनांचा समावेश आहे. जप्त केलेल्या मोटारींमध्ये फॉर्च्यूनर, इनोवा व क्वालिस या मोटारी आहेत. या सर्व मोटारींची किंमत 41 लाख 35 हजार रुपये आहे.

संगोळ्ळी रायन्ना मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील 232 कोटीच्या ठेवी अद्याप ठेवीदारांना परत दिलेल्या नाहीत. त्यामुळे गुरुवारी (ता. 31 मे) शेकडो ठेवीदारांनी हनुमाननगर येथील अप्पुगोळ यांच्या बंगल्यासमोर जमून निदर्शने केली. यानंतर पोलिस प्रशासनाला जाग आली.

गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेल्या संगोळ्ळी रायन्ना सोसायटीवरील कारवाईला पोलिसांनी आज पुन्हा प्रारंभ केला.
गुरुवारी अप्पुगोळ यांच्या बंगल्यासमोर जेव्हा ठेवीदार जमले होते, तेव्हा पोलिस अधिकारीही मोठ्या संख्येने होते. यावेळी  बंगल्यासमोर मोठ्या प्रमाणात वाहने थांबल्याचे लक्षात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार अप्पूगोळ यांची सर्व मालमत्ता जप्त करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून आज सकाळी पोलिसांनी त्यांच्याजवळील वाहने ताब्यात घेतली. यामध्ये ३३ लाख ५० हजार रुपये किमतीच्या तीन मोटारी व सात लाख 85 हजार रुपये किमतीच्या तीस दुचाकींचा समावेश आहे. ही सर्व वाहने जप्त करून आज पोलिस आयुक्तालयाच्या पटांगणात आणून लावण्यात आली.

जप्त केलेल्या मोटारींमध्ये किंमती फॉर्च्यूनरचाही समावेश आहे. ही सर्व वाहने ठेवीदारांच्या पैशातून खरेदी केल्याचा संशय पोलिसांना असल्याने ती जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT