Nitish Kumar trusted leader-Important role in alliance with BJP-Who is Sanjay Jha-bihar marathi news 
देश

Sanjay Jha: संजय झा यांची जेडीयूच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती; बिहारमध्ये नव्या राजकारणाला सुरुवात

युतीबाबत कामगिरी करण्याची महत्वाची जबाबदारी झा यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पाटणा : जनता दल युनायटेड अर्थात जेडीयू या पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी संजय झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवी दिल्लीत पार पडलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते. (Sanjay Jha appointed as JDU working president New politics started in Bihar)

दिल्लीच्या कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये पार पडलेल्या जेडीयूच्या बैठकीत खुद्द नितीश कुमार यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदासाठी संजय झा यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. यानंतर सर्वसंमतीनं झा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आणि घोषणा झाली. त्यानंतर झा यांचं सर्वच वरिष्ठ नेत्यांनी स्वागत केलं.

कोण आहेत संजय झा?

बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील झंझारपूर इथल्या अरडिया या गावचे संजय झा हे रहिवासी आहेत. जेडीयूमध्ये येण्यापूर्वी संजय झा हे भाजपत होते. ब्राह्मण समाजाचं प्रतिनिधीत्व करणारे झा हे मिथिलांचलमध्ये जेडीयूचे मोठे नेते मानले जातात. ते सध्या राज्यसभा खासदार आणि पक्षाच्या संसदीय पक्षाचे नेते आहेत. संजय झा यांनी २०१४ मध्ये दरभंगा इथून लोकसभा निवडणूक लढवली होती. पण त्यांचा इथं पराभव झाला होता. त्यानंतर ते विधानपरिषदेवर निवडून आले आणि २०१४ पासून २०२४ पर्यंत बिहार सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत.

बैठकीनंतर जेडीयूचे नेते अशोक चौधरी यांनी सांगितलं की, जेडीयू आणि भाजपच्या युतीची जबाबदारी संजय झा यांच्यावर सोपवण्यात आली आहे. झा यांचे भाजपसोबत चांगले संबंध आहेत. याद्वारे राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत लढताना महत्वाच्या गोष्टी पदरात पाडून घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.

संजय झा यांच्यापूर्वी जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव, नितीश कुमार, आरपीसी सिंह, ललन सिंह यांनी जेडीयूच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे.

विशेष राज्याची मागणी कायम

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीबाबत महत्वाची चर्चा पार पडली. यामध्ये बिहारला विशेष दर्जा आणि विशेष पॅकेजची आमची जुनी मागणी आजही कायम असल्याचं अशोक चौधरी यांनी सांगितलं. येणाऱ्या काळात आमचे सर्व वरिष्ठ नेते पंतप्रधानांना भेटून आपली ही मागणी प्रभावीपणे मांडतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Crime : सायबर ठगांनी पोलिस अधिकाऱ्यालाच १७ दिवस 'डिजिटल अरेस्ट' मध्ये ठेवले; २२ लाख उकळले अन्...

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

Ashadhi Ekadashi 2025 Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासाला बनवा पौष्टिक रताळ्याचे कटलेट, सोपी आहे रेसिपी

Mobile Addiction : बाबा, गेम खेळू दे...नकार मिळताच मुलीने संपवल आयुष्य! कळंब हादरलं

मोठी बातमी! पहिल्या फेरीत प्रवेश न घेतल्यास विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीपर्यंत थांबावे लागणार; दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविण्यास १३ जुलैपर्यंत मुदत

SCROLL FOR NEXT