Sanjay Raut criticize Chief Minister eknath shinde Delhi visit  Sakal
देश

खासदार फोडण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत : संजय राऊत

आमदारानंतर खासदारांमध्ये फूट पडल्याने संतप्त झालेले शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर कडाडून टीका

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : आमदारानंतर खासदारांमध्ये फूट पडल्याने संतप्त झालेले शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर कडाडून टीका केली आहे. महाराष्ट्रात पूर आलेला असताना मुख्यमंत्री सरकार वाचवण्यासाठी आणि खासदार फोडण्यासाठी दिल्लीत येत आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. भाजपला महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहे त्याआधी शिवसेनेचे तुकडे करण्याचा हा डाव आहे, असाही आरोप राऊत यांनी आज केला. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना सर्व गोष्टींसाठी तयार आहे, असे ते म्हणाले.

शिवसेनेने मला अपेक्षेपेक्षा खूप काही दिले. त्यामुळे पक्षाला संकटाच्या काळात कधीही सोडून जाणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहीन.

- संजय जाधव, खासदार, शिवसेना

शिरूरमधील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसकडून संपविली जात होती. शिवसैनिकांना ताकद देण्यासाठी, विकास कामे होण्यासाठी मी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत सहभागी झालो आहे.

- शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार, शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT