sanjay raut sakal media
देश

फक्त निषेधाचे खलिते पाठवून चालणार नाही; राऊतांचा राज्य सरकारला सल्ला

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बेळगावात मएच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यावर संताप व्यक्त केला.

नवी दिल्ली - शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बेळगावात मएच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यावर संताप व्यक्त केला. महाराष्ट्र सराकरने कठोर पावले उचलावीत असी मागणी त्यांनी केली आहे. तसंच फक्त खलिते पाठवून चालणार नाही असंही त्यांनी म्हटलं. याशिवाय राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हिंदूत्वाबद्दल केलेल्या विधानावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिल्लीत (Delhi) बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, देश सगळ्यांचा जरी असला तरी बहुसंख्य हिंदुंच्या भावना डावलून राजकीय पावले टाकता येणार नाही. याबाबत राहुल गांधींशी अनेकदा चर्चा झाली. तरी त्यांनी मी हिंदू आहे आणि काँग्रेसचा आत्माही हिंदू आहे असं म्हटलं. महात्मा गांधींपासून मदनमोहन मालवीय याच्या पर्यंत सर्वांचा आत्मा हिंदू होता हे राहुल गांधींनी मान्य केलं. आता काँग्रेसची पावले त्यानुसार पडतील अशी आशाही राऊतांनी व्यक्त केली.

राज्यात नागपूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत (Nagpur Legislative Council Election) भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंनी (Bjp Chandrashekhar Bawankule) विजय मिळवला आहे. यावरून विचारले असता राऊत म्हणाले की, बावनकुळेंनी विजय मिळवला ही चांगलीच गोष्ट आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची परिस्थिती आणि गणित वेगळं असतं.

बेळगावमध्ये (Belgaum) महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, महाराष्ट्र सरकारने फक्त निषेध करून चालणार नाही, मराठी बांधव आणि एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होतात आम्ही फक्त निषेधाचे खलिते पाठवतो अशा शब्दात राऊतांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, अजित पवारांनी निषेध व्यक्त केला. जे दोन मंत्री सीमा प्रश्नासाठी नेमले आहेत त्यांनी तात्काळ बेळगावला जाऊन मए च्या कार्यकर्त्यांशी चर्चा करायला हवी.

तसंच या घटनेला बेळगावची जनताही जबाबदार आहे. बेळगावच्या निवडणुकीत भाजपला विजयी केलं त्यामुळे महाराष्ट्रद्वेष्ट्यांचे बळ वाढून हल्ले होतायत . मराठी माणसाला हा धडा आहे. एकजूट नसेल तर काय होतं हे हल्ल्यानं दिसून आलं. महाराष्ट्रासाठी वेदनादायी घटना आहे आणि महाराष्ट्र सरकारने कठोर पावले उचलायला हवीत असंही राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT