Snjay Raut esakal
देश

राज्यपाल फारच अभ्यासू, इतका अभ्यास बरा नव्हे : राऊत

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : शिवसनेचे खासदार संजय राऊत (Snjay Raut) यांनी आजच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना उपरोधिक टोला लगावला. त्यांनी 12 आमदारांच्या शिफारसीवर होत असलेल्या विलंबावरून त्यांच्यावर टीका केली.

शिवसेना खासदार संजय राऊत (Snjay Raut) यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना राज्यपालांवर टीका केली. त्यांनी 'महाराष्ट्राचे राज्यपाल हे फारच अभ्यासू व्यक्ती आहेत. इतका अभ्यास बरा नव्हे घनेत स्पष्ट लिहिले आहे की राज्य सरकारने राज्यपालांना केलेल्या शिफारसी त्यांनी मान्य करायच्या असतात. आमच्या 12 आमदारांची नियुक्ती करणे त्यांना बंधनकारक आहे. लोकशाहीत इतका अभ्यास बरा नाही. तुम्हाला त्वरित निर्णय घ्यायचा असतो.' असे म्हणत राज्याचे राज्यपालांकडे असलेल्या महत्वाचे प्रलंबित निर्णय त्यांनी त्वरित घ्यावे अशी मागणी केली.

याचबरोबर संजय राऊत (Snjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर भाजपसाठी निधी मागण्यावरुन टीका केली. ते म्हणाले की, 'भारत शेतकऱ्यांमुळे, कष्टकऱ्यांमुळे आणि उद्योजकांमुळे बलाढ्य झाला आहे. मात्र आम्हाला आताच नव्याने समजलं की भाजपला देणग्या दिल्याने देश बलाढ्य होतो. यामुळे देशात गोंधळ निर्माण झाला आहे. देणग्या आम्हालाच द्या दुसऱ्याला देऊ नका असा स्पष्ट संदेश आहे. देशातील लोकांकडून देणग्या घेणं हा बहाणा आहे. हा देशातील उद्योगपतींना स्पष्ट संदेश आहे की देणग्या आम्हालाच द्या. दुसऱ्याला दिल्या तर आमचं त्यावर लक्ष राहील. भाजपच्या बँक खात्यात शेकडो कोटी जमा झाले आहेत.'

राऊत (Snjay Raut) पुढे म्हणाले की, 'पक्षाला देणगी देण्यात कोणाची हरकत नाही. मात्र देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या पक्षासाठी निधी मागणे योग्य नाही. याच्यावर आक्षेप घेतला जाऊ शकतो. मी घेत नाही मात्र आक्षेप घेतला जाऊ शकतो. हे पंतप्रधानांचे काम नव्हे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT