देश

संजय राऊत म्हणतात, 'फट गयी'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भारतीय हवाईदलाच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर केलेल्या धाडसी कारवाईबद्दल कौतुक करताना म्हटले आहे की, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची फाटली असेल असे म्हटले आहे. त्यांनी इम्रान खान यांचा एक फोटो ट्विट केला आहे, यामध्ये इम्रान खान रक्तदाब तपासणी करतानाचा फोटो आहे. हा फोटो ट्विट करत त्यांनी 'फट गयी' असा प्रश्न केला आहे.

तसेच, त्यांनी भारतीय सैन्याचे अभिनंदन करताना 'हिंदुस्तानच्या फायटर विमानांनी पाकव्याप्त काश्मीर वर हल्ला केला. वायू सेनेचे अभिनंदन. जैश ए मोहम्मदचा सैतान अजहर मसुदला मारल्या शिवाय बदला पुर्ण होणार नाही' असे ट्विट करत भारतीय हवाईदलाचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान, पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देश दु:खात होता. परंतु असे असताना संपूर्ण देश सैन्याच्या पाठीशी उभा राहिला होता. कोणतेही राजकारण न करता सर्व भारतीय जनता आणि सर्वच राजकीय पक्ष त्यांच्या पाठीमागे उभे राहिले होते. आज भारतीय हवाईदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला केला. त्यामध्ये जवळजवळ 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि आपली सर्व विमाने सुखरूप परत आली. यामध्ये जैश ए मोहम्मद, हिजाबुल मुझाहिद्दीन, लष्करे ए तोयबा अशा अनेक अतिरेकी संघटनांचे कंबरडे मोडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT