Santosh Sawant 
देश

Santosh Sawant : छोटा राजनचा निकटवर्तीय संतोष सावंतला अखेर भारतात आणलं; दोन दशकांपासून होता फरार

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) छोटा राजनचा साथीदार संतोष सावंत याला सिंगापूरमधून भारतात आणलं आहे. सिंगापूरमध्ये राहणारा सावंत हा हॉटेल व्यवसायाच्या नावाखाली छोटा राजनसाठी काम करत होता. संतोष सावंत हा राजनचे आर्थिक काम पाहत होता.

संतोष दोन दशकांपासून फरार होता. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष सावंतला आधी सीबीआय ताब्यात घेईल, त्यानंतर त्याला क्राइम ब्रँच ताब्यात घेईल. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार सावंत यांना दिल्लीत दाखल होताच सीबीआयने ताब्यात घेतले आहे

संतोष सावंत हा सुमारे २२ वर्षांपासून राजन टोळीशी संबंधित आहे. सावंत हा छोटा राजनच्या सर्वात जवळच्या व्यक्तींपैकी एक असून डी. के. राव यांच्यानंतर सावंत या टोळीत दुसऱ्या क्रमांकावर होता. जेव्हा २००० साली छोटा राजनवर हल्ला झाला होता. त्यानंतर रवी पुजारी, हेमंत पुजारी, बंटी पांडे आणि विजय शेट्टी असे त्याचे जवळचे मित्र त्याला सोडून गेले. पण सावंत यांनी छोटा राजनची साथ सोडली नाही. त्यानंतर तो लवकरच राजनच्या जवळ गेला.

डी. के. राव यांच्याकडे टोळीशी संबंधित गुन्ह्यांचे काम असताना सावंत यांनी राजनच्या काळ्या कमाईकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. राजनच्या कंपनीचे प्रॉपर्टी डीलिंग आणि फायनान्स पूर्णपणे संतोषने आपल्या ताब्यात घेतले होते. २००० मध्ये त्याच्या प्रत्यार्पणाची कागदोपत्री प्रक्रिया सुरू झाली होती. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही बजावण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT