देश

'सरल वास्तू'चे चंद्रशेखर गुरू यांची हत्या; घटना सीसीटीव्हीत कैद

सकाळ डिजिटल टीम

हुबळी - आपल्या ''सरल वास्तू"तून आपलं वेगळपण सिद्ध करणारे चंद्रशेखर अंगाडी उर्फ चंद्रशेखर गुरुजी यांची हुबळी येथील एका हॉटेलमध्ये चाकू मारून हत्या करण्यात आली आहे. हॉटेलमध्ये ते कोणाला तरी भेटायला गेले होते, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. (chandrashekhar guruji stabbed)

हॉटेलच्या रिसेप्शनला लावलेल्या टीव्हीमध्ये चंद्रशेखर यांच्यावर चाकूने वार केल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये चंद्रशेखर यांच्यावर हल्ला होत असल्याचे पाहून तेथे उभे असलेले लोक पळून जाताना दिसतात. मारेकऱ्यांचा शोध सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितलं. या हत्येनंतर हॉटेलमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुजी वैयक्तिक कामानिमित्त हुबळी येथे आले होते.

वास्तू तज्ज्ञ म्हणून त्यांनी आपलं करियर सुरू केलं होतं. पुढे त्यांना मुंबईत नोकरी लागली. त्यानंतर चंद्रशेखर यांनी वास्तूचे काम सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर यांची दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हत्या करण्यात आली. पोलिसांनी सांगितलं की दोन अनुयायी म्हणून उभे असलेल्या दोन व्यक्तींनी गुरुजींवर हल्ला केला. हल्ल्यानंतर दोघेही तेथून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

दिवसाढवळ्या हत्या हे भयंकर : मुख्यमंत्री बोम्मई

कर्नटाकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर गुरुजींची हत्या होणं हे अत्यंत भयंकर घटना आहे. ही घटना दिवसाढवळ्या घडली. व्हिडिओमध्ये दिसणार्‍या गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिस आयुक्त लभू राम यांच्याशी चर्चा केली आहे. पोलिस या घटनेचा तपास करत असल्याचं मुख्यमंत्री बोम्मई यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Satej Patil Friendship: मंत्री मुश्रीफांचा फोन, सतेज पाटील यांची साथ; बाहूरन विरोध आतून मदत, गोकुळची राजकीय पेरणी

Stock Market Today: युद्धातही शेअर बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 450 अंकांनी वाढला; कोणते सेक्टर तेजीत?

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

SCROLL FOR NEXT