Rahul Gandhi Team eSakal
देश

देवी सरस्वती भेदभाव करत नाही; हिजाब प्रकरणावर राहुल गांधींची प्रतिक्रीया

कर्नाटकच्या कुंदापूरमध्ये हिजाब परिधान करणाऱ्या विद्यार्थींनीना शाळेत प्रवेश नाकारला आहे.

सुधीर काकडे

कर्नाटकात हिजाबवरून (Karnataka Hijab) सुरू असलेल्या घटना अद्यापही थांबलेल्या दिसत नाही. हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिनींना कुंदापूर येथील भांडारकर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर रोखण्यात आलं होतं. या घटनेनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटताना दिसत आहेत. त्यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधींनी देखील या घटनेचा निशेध केला आहे.

हिजाबमुळे विद्यार्थीनींच्या शिक्षणात अडथळा आणून आपण भारतातील मुलींचं भविष्य धोक्यात आणता आहात. देवी सरस्वती सर्वांना ज्ञान देते. ती कुणाशीही भेदभाव करत नाही असं राहुल गांधी म्हणाले आहेत. कॉलेजच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, विद्यार्थ्यांना गणवेशातच वर्गात यावं लागेल. बुरखा किंवा हिजाब घालून तुम्हाला महाविद्यालयात येता येणार नाही, असं महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थिनींना म्हटलं. पण, आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून हिजाब घालून महाविद्यालयात येत आहोत. त्यामुळे आम्हाला परवानगी दिली पाहिजे, असं विद्यार्थिनींनी म्हटलं. तरीही त्यांना प्रवेश नाकारण्यात आला.

भंडारकर महाविद्यालयाच्या प्रशासनाने बुधवारी भगवा दुपट्टा घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही परवानगी नाकारली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्याने कॅम्पसमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT