Doklam Sakal
देश

विवादित क्षेत्र डोकलामजवळ चीनने वसवली गावं, उपग्रहाच्या फोटोतून उघड

भारताच्या राजकीय हिताच्या दृष्टीने हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

सकाळ डिजिटल टीम

Chinese Village New Satellite Images : चीनच्या कुरघोड्या काही केल्या कमी होताना दिसत नसून, आता चीनने भूतानच्या बाजूने असलेल्या डोकलाम पठाराजवळ गाव वसवल्याचे समोर आले आहे. उपग्रहाच्या सहाय्याने काढण्यात आलेल्या फोटोतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. भारताच्या राजकीय हिताच्या दृष्टीने हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ही छायाचित्रे MAXAR कंपनीने काढली आहेत. (India China Border Crises News In Marathi)

उपग्रहाच्या फोटोतून चीन अमो चू नदीच्या खोऱ्यात आणखी एक गाव वसवत असल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर, या गावाची जवळपास पूर्णत्वाकडे आल्याचेही या फोटोतून दिसून येत आहे. त्याचवेळी चीनने दक्षिण भागात तिसऱ्या गावाचीदेखील निर्मिती सुरू केली असून, फोटोंमध्ये 6 इमारतींचा पायाही दिसत आहे.

याशिवाय इतर अनेक बांधकामांचे कामही वेगाने सुरू असल्याचे उपग्रहाच्या फोटोतून स्पष्ट होत आहे. इतकेच नव्हे तर, MEXAR ने काढलेल्या फोटोंमध्ये गावातील प्रत्येक घराच्या दारात कार उभ्या असलेल्या दिसून येत आहे. दरम्यान, नव्याने समोर आलेल्या या फोटोंवर अद्यापपर्यंत लष्कराकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT