सतीश पुनीया esakal
देश

'भाजप सरकार येत नाही तोवर डिनर घेणार नाही'

राजस्थानमध्ये पक्षाची सत्ता येईपर्यंत मी हार घालणार नाही - सतीश पुनीया

स्नेहल कदम

राजस्थानमध्ये पक्षाची सत्ता येईपर्यंत मी हार घालणार नाही - सतीश पुनीया

सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणूकांची (Assembly Election 2022) रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय शब्दफेक आणि टीकाटिप्पणी पहायला मिळत आहे. रॅलीदरम्यान सभा, भेटीगाठी आणि दिली जाणारी आश्वासने यामुळे या निवडणूका चुरशीने होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. सत्तेत येण्यासाठी नेतेमंडळी दावेप्रतिदावे करण्यात व्यस्त आहेत. यातच आता राजस्थानचे भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया (Satish Poonia) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. 'जोपर्यंत राजस्थानमध्ये (Rajasthan) भाजप सरकार स्थापन करत नाही, तोपर्यंत हार आणि साफा घालणार नाही, एवढेच नाही तर रात्रीचे जेवण न करण्याचा पवित्राही सतीश पुनिया यांनी घेतला आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा (UP Election 2022) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अलिगड येथे एका निवडणूक रॅलीला सतीश पुनिया यांनी संवाद साधला केले. ते म्हणाले, राजस्थानमध्ये पक्षाची सत्ता येईपर्यंत मी हार घालणार नाही आणि रात्रीचे जेवण करणार नाही. यादरम्यान भाजप नेते सतीश पुनिया यांनी पुढील निवडणुकीत काँग्रेसला उखडून टाकण्याचा संकल्पही केला. पुढे ते म्हणाले, 'मी संकल्प केलाय जोपर्यंत 2023 मध्ये राजस्थानातून काँग्रेसला (Congress) हद्दपार करून भाजपला प्रचंड बहुमत देत नाही, तोपर्यंत मी हार घालणार नाही. याशिवाय मी रात्रीचे जेवणही त्याग करत आहे. दरम्यान, साफा ही राजस्थानातील एक पारंपरिक पगडी आहे, जी संस्कृतीचे प्रतीक मानली जाते.

दरम्यान, आता त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय वाद यामुळे टोकाला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहेत. सतीश पुनीया यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे ते त्याचे पालन करतील का हे पाहणे आता औत्सक्याचे ठरणार असल्याची चर्चा सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT