Rana Aayub 
देश

Rana Ayyub: सौदी अरब 'रक्तपिपासू' राणा आयुब यांचा संताप

गुजरात फाइल्स (Gujrat Files) नावाचं पुस्तक लिहून वाचकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या पत्रकार राणा आयुब यांनी आता सौदी अरबला धारेवर धरले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Saudi Arabia Houthis Rebels Conflict: गुजरात फाइल्स (Gujrat Files) नावाचं पुस्तक लिहून वाचकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या पत्रकार राणा आयुब यांनी आता सौदी अरबला धारेवर धरले आहे. त्यामुळे त्यांना नेटकऱ्यांकडून ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. राणा आयुब या त्यांच्या वादग्रस्त स्वभावामुळे ओळखल्या जाणाऱ्या सेलिब्रेटींपैकी एक आहेत. त्यांच्या गुजरात फाईल्स नावाच्या पुस्तकानं मोठा गदारोळ केला होता. अमेरिका अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, अमेरिका आणि दुबईतील सैनिकांनी जे विद्रोही आहेत त्यांना जेरीस आणले होते. त्या व्हि़डिओवरुन आयुब यांनी भाष्य केले आहे.

यमन आणि सौदी अरब यांच्यातील बराच काळ चाललेल्या लढाईनं साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या दोन देशांमधील वाद नव्यानं समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबु धाबीवर ड्रोन हल्ला झाला होता. त्यामध्ये दोन भारतीयांचा मृत्यु झाला होता. या प्रकरणावरुन साऱ्या देशभरातून टीकेची झोड़ उठवली आहे. त्यामुळे जगभरातून देखील अरब देशांवर टीका करण्यात आली होती. आता त्यामध्ये राणा आयुब यांचाही समावेश आहे.

भारतीय पत्रकार राणा आयुब यांनी अरब देशांवर टीका केली आहे. त्यामध्ये या देशांना रक्तपिपासू असं म्हटलं आहे. यमन देशामध्ये सध्या रक्तपात सुरु आहे. अशाप्रकारच्या रक्तपिपासू देशांमध्ये लोकं कशी काय सुरक्षित राहू शकतात असा प्रश्न राणा आयुब यांनी केला आहे. एक मुस्लिम म्हणून मला यासगळ्या गोष्टींची प्रचंड शरम वाटते आहे. जो काही नरसंहार सुरु आहे, त्याला काहीच अर्थ नाही. कोणालाही त्याच्याविषयी काही वाटेनासं झालं आहे. जे काही सुरु आहे त्याचे कोणत्याही परिस्थितीमध्ये समर्थन होऊ शकत नाही. बलाढ्य देशांनी अशाप्रकारे छोट्या देशांना त्रास देणं हे कुठल्या माणूसकीच्या देशात येते, असा प्रश्नही आयुब यांनी विचारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Overhead Cable Action: अनधिकृत ओव्हरहेड केबलवर महापालिकेची धडक कारवाई कायम; इंटरनेट बंद पडल्याने ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरदारांची तारांबळ

GT vs RR Live : वैभव सूर्यवंशीची विक्रमी कामगिरी! यशस्वी जैस्वालसोबत मोडला सेहवाग-गंभीरचा विक्रम, रिषभ पंतवरही केली कुरघोडी

Pune News: शाळेतील फी वाढ अन्यायकारक! पुण्यात पालकांचं आंदोलन; मनसेच्या आंदोलकांनी केली पैशांची उधळण

Latest Marathi News Live Update : जय पवार यांनी बांधावर जाऊन केली नुकसानीची पाहणी

Pune Civic Negligence: पुण्यात बेमोसमी पावसानंतर धुळीचे लोट, रस्त्यावर खडी-मातीचा ढिगारा; महापालिका, ठेकेदारांच्या निष्क्रियतेने नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT