SBI Sends Electoral Bonds Data esakal
देश

SBI Sends Electoral Bonds Data: SBI ने भारतीय निवडणूक आयोगाला निवडणूक रोख्यांचा डेटा पाठवला...

SBI Sends Electoral Bonds Data: निवडणूक रोख्यांप्रकरणी काल (सोमवार) सुप्रीम कोर्टात सुनावणी झासी. ही सुनावणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) याचिकेवर होती. ज्यामध्ये राजकीय पक्षांना मिळालेल्या प्रत्येक निवडणूक रोख्याचा तपशील जाहीर करण्यासाठी ३० जून २०२४ पर्यंत मुदत वाढवण्याची विनंती करण्यात आली होती.

Sandip Kapde

SBI Sends Electoral Bonds Data

निवडणूक रोख्यांप्रकरणी काल (सोमवार) सुप्रीम कोर्टात सुनावणी झासी. ही सुनावणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) याचिकेवर होती. ज्यामध्ये राजकीय पक्षांना मिळालेल्या प्रत्येक निवडणूक रोख्याचा तपशील जाहीर करण्यासाठी ३० जून २०२४ पर्यंत मुदत वाढवण्याची विनंती करण्यात आली होती. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने कठोरता दाखवत SBI ने उद्याच (मंगळवार) बाँडशी संबंधित सर्व माहिती द्यावी आणि निवडणूक आयोगाने १२ मार्चपर्यंत ती प्रसिद्ध करावी, असे सांगितले.

भारतीय निवडणूक आयोगाकडे निवडणूक रोख्यांचे तपशील सादर करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत वाढवून देण्याची मागणी करणारा स्टेट बँक ऑफ इंडियाचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एसबीआयने निवडणूक रोख्यांचा डेटा आज मंगळवार सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला इशारा दिला होता की जर बँकेने १२ मार्चपर्यंत बाँडचे तपशील निवडणूक आयोगाकडे न दिल्यास त्यांच्याविरुद्ध अवमानाची कारवाई केली जाईल.

सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोखे घटनाबाह्य ठरवले आहेत. 15 फेब्रुवारी 2024 रोजी दिलेल्या ऐतिहासिक निकालात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना रद्द केली होती. त्यानंतर न्यायालयाने हे घटनाबाह्य ठरवले आणि EC ला देणगीदार, देणगी म्हणून दिलेली रक्कम आणि प्राप्तकर्ते १२ मार्चपर्यंत उघड करण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्ड्रिफ सिरप (Batch No. SR-13) चा तात्काळ वापर थांबविण्याचे एफडीएचे आदेश

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT