Thackeray vs shinde chief justice d y chandrachud read marathi letter for supreme court  Esakal
देश

Thackeray Vs Shinde: "तीन वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला?" सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा सवाल

राज्यपालांचे वकील तुषार मेहता यांच्या युक्तीवादानंतर सुप्रीम कोर्टाची मोठी टिप्पणी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राज्याच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. सुनावणीदरम्यान राज्यपालांचे वकील तुषार मेहता यांचा युक्तीवाद पार पडला. यानंतर सुप्रीम कोर्टानं महत्वाची टिप्पणी केली. तीन वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा काय मोडला? असा सवाल कोर्टानं उपस्थित केला. तसेच सरकार पडेल असं कृत्य राज्यपालांनी करायला नको होतं, अशी टिप्पणी सरन्यायाधीशांनी यावेळी केली. (How did three years of happy life end in one night SC question on power struggle in Maharashtra)

सुप्रीम कोर्टानं म्हटलं की, तीन वर्षांनंतर अचानक हे लोक आपल्याकडं कसे आले? असा प्रश्न राज्यपालांनी स्वतःला विचारायला हवा होता. या सगळ्या घटना सरकार निवडून आल्यानंतर एक महिन्यानं नाही तर तीन वर्षांनी घडल्या. त्यामुळं बहुमत बोलावणं म्हणजे सरकार पाडण्याचं पाऊल दिसतं होतं, असंही कोर्टानं म्हटलं.

शिंदेंच्या शिवसेनेचे बंडखोर आमदार तीन वर्षात राज्यपालांकडे का गेले नाहीत. जीवाला धोका म्हणून बहुमत चाचणी बोलावणं अयोग्य असल्याची टिप्पणीही यावेळी सुप्रीम कोर्टानं केली. यामध्ये ३४ आमदारांकडून गटनेत्याची निवडक करणं हा मुद्दा योग्य असल्याचंही यावेळी कोर्टानं म्हटलं.

हे ही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

महाराष्ट्र हे राजकीयदृष्ट्या सुसंस्कृत राज्य आहे, त्यामुळं अशी घटना घडणं हे राज्यासाठी निराशाजनक आहे. बहुमत चाचणीसाठी पत्र लिहिणं योग्य नाही, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानं राज्यपालांच्या कृतीवरच प्रश्न उपस्थित केले. तसेच तीन वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा काय मोडला? तीन वर्षे आनंदाने नांदलात, त्यानंतर एका कारणामुळं सरकार पाडलं का? असा सवालही त्यांनी राज्यपालांना विचारला. सरकार पडेल असं कृत्य राज्यपालांनी करायला नको होतं, बहुमत बोलावणं सरकार पाडण्याचं पाऊल दिसंत होतं, असंही सुप्रीम कोर्टानं यावेळी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Mulshi Aadhaar: आधार अपडेटअभावी मुळशीतील १,२४६ विद्यार्थी अडचणीत; ३० सप्टेंबरच्या डेडलाइनने प्रशासनाची परीक्षा

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Leopard Attack Nirgudsar: निरगुडसरमध्ये बिबट्याचा हल्ला; ब्रिडिंगसाठी आणलेला ६० हजारांचा बोकड व मेंढी ठार

SCROLL FOR NEXT