after acquitted by supreme court accused in chhawla case committed another murder cji will hear case again  Sakal
देश

Hate Speech Case: भडकाऊ भाषणं रोखण्यात शिंदे सरकार अपयशी! सुप्रीम कोर्टानं दिले 'हे' आदेश

या प्रकरणावर २८ एप्रिल रोजी सुप्रीम कोर्टानं पुढील सुनावणी ठेवली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाचे आदेश असतानाही राज्यातील हिंदू संघटनांकडून भडकाऊ भाषणं होताना दिसत आहेत. यावर राज्य सरकार नियंत्रण ठेऊ शकलेलं नाही. त्यामुळं कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी कोर्टानं सरकारविरोधात याचिका दाखल केली असून त्यावर उत्तर देण्यास सांगितलं आहे. राज्य सरकारविरोधातील या याचिकेवर २८ एप्रिल रोजी सुनावणी घेणार असल्याचंही सुप्रीम कोर्टानं निश्चित केलं आहे.

याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने मंगळवारी सांगितलं होतं की, "भडकाऊ भाषणं टाळणं हे जातीय सलोखा राखण्यासाठी महत्त्वाचं आहे. सुप्रीम कोर्टाचे असे स्पष्ट आदेश असताना गेल्या चार महिन्यांत राज्यात हिंदू संघटनांकडून किमान 50 मोर्चे काढण्यात आले असल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. या वृत्ताच्या आधारे सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारच्या विरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करण्याचं मान्य केलं होतं.

दरम्यान, या अवमान याचिकेला उत्तर देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. यावर २८ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. यावेळी राज्य सरकारला या हेटस्पीच प्रकरणावर उत्तर द्यावं लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT