SC extends stay on tree-cutting in Aarey forest 
देश

Aarey forest: आणखी झाडे तोडण्यास स्थगिती कायम

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली -  मुंबईतील ‘आरे’ कॉलनी परिसरात मेट्रोच्या कारशेडचे बांधकाम करण्यास आडकाठी नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करतानाच आणखी झाडे तोडण्यासाठीची ‘जैसे थे’ परिस्थिती किंवा स्थगिती कायम असल्याचे आज नमूद केले. याप्रकरणी न्या. अरुण मिश्रा व न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठासमोर येत्या १५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

दरम्यान, ‘आरे’ परिसरातील तोडलेल्या झाडांच्या बदल्यात किती नवी झाडे लावण्यात आली, तसेच किती झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले, याबाबतचा सद्यस्थितीजनक अहवाल न्यायालयास पुढील सुनावणीपर्यंत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने मुंबई रेल्वे महामंडळाला दिले आहेत. न्यायालयाने वृक्षतोडीबाबत यापूर्वी दिलेल्या ‘जैसे थे’च्या आदेशाचे पालन करण्यात आल्याचे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगितले.

आरेमधील प्रस्तावित कारशेडसाठी करण्यात आलेल्या हजारो वृक्षतोडीच्या विरोधात दाखल झालेल्या जनहितार्थ याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. यापूर्वीच्या सुनावणीत (ता. ७ ऑक्‍टोबर) न्यायालयाने आणखी झाडे तोडण्यास मनाई केली होती. आजच्या सुनावणीत मेट्रो कारशेडच्या बांधकामाला कोणतीही स्थगिती नसल्याचे सांगत न्यायालयाने कारशेडसाठी हिरवा कंदील दाखविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : अन्याय, भ्रष्टाचारावर शांत बसत असाल तर…, तुकाराम मुंढेंच्या पोस्टने लक्ष वेधलं

Ganeshotsav Rain Forecast : गुड न्यूज! महाराष्ट्रात पुन्हा पावसाला पोषक हवामान; गणेशोत्सव काळात जोरदार पावसाचा अंदाज

Maharashtra Cabinet: दिलीप वळसे-पाटलांच्या विरोधानंतर मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याला अखेर स्थगिती

Maharashtra Monsoon: शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यातील ८३ तालुक्यांत २० दिवसांहून अधिक पाऊस गायब; खरीप पिके करपण्याच्या मार्गावर

Amruta Fadnavis: गरबा सर्वसमावेशक उत्सव; मुस्लिमांच्या प्रवेशाला विरोध का? अमृता फडणवीस यांची भूमिका

SCROLL FOR NEXT