देश

Supreme Court : धार्मिक नावांचा वापरावरून सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

सकाळ डिजिटल टीम

Supreme Court Issues Notice ECI : राजकीय पक्षांकडून वापरण्यात येणाऱ्या धार्मिक नावांच्या आणि चिन्हांच्या नावाबाबत कठोर पावलं उचलली असून, याप्रकरणी न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. धार्मिक नावं आणि चिन्हं वापरल्याबद्दल राजकीय पक्षांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान, सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. तसेच न्यायालयाने अशा पक्षांना निवडणूक लढवण्यास बंदी घालावी अशी मागणी याचिकाकर्त्याकडून करण्यात आली असून, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारकडून चार आठवड्यांत उत्तर मागितले आहे.

राजकीय पक्षांकडून धार्मिक नावांचा आणि चिन्हांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत यावर आक्षे घेण्यात आला होता. वसीम रिझवी यांनी या विरोधात याचिका दाखल केली आहे. जर धर्माच्या नावावर मते मागणे बेकायदेशीर असेल, तर पक्षाचे नावही धर्माच्या आधारावर असू शकत नाही, असे मत याचिकाकर्ते रिझवी यांनी व्यक्त केले आहे. यासाठी त्यांनी इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि हिंदू एकता दल या पक्षांचे उदाहरण दिले आहे. न्यायालयाने अशा पक्षांना निवडणूक लढवण्यास बंदी घालावी. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारकडून चार आठवड्यांत उत्तर मागितले आहे. याचिकाकर्त्याची बाजू मांडणारे वकील गौरव भाटिया यांनी न्यायालयात सांगितले की, राजकीय पक्षांच्या भांडणात चंद्र ताऱ्यांचा वापर थांबवावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIP Investment : FD सोडून आता SIP कडेच लोकांचा कल! 5 मोठी कारणे जी बदलत आहेत बचतीची पद्धत

पाकिस्तानी खेळाडूंवर 'भांडी' घासण्याची वेळ, हॉटेलमध्ये राहण्याचे पैसे नाही भरले अन्... कर्णधाराला संताप अनावर, बोर्डावर केले आरोप

थलायवा रजनीकांत घेणार अभिनयातून निवृत्ती ? शेवटच्या सिनेमाच्या शूटिंग लवकरच सुरु होणार

PAK vs NAM, T20 WC : भारताविरुद्ध भोपळा अन् लिंबूटिंबू संघाविरुद्ध शतक! पाकिस्तानची दुबळ्या संघासमोर मर्दुमकी, २०० धावांचे लक्ष्य

Latest Marathi News Live Update : पुणे - इंदोर महार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT