supreme court to centre on ED chief sanjay kumar mishra third extension of service  
देश

Supreme Court: EDच्या संचालकांना तात्पुरती मुदतवाढ; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला दिलासा

ईडीच्या संचालकांना मुदतवाढ देण्यात यावी अशी याचिका केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : ईडीचे संचालक एस. के. मिश्रा यांना मुदतवाढ देण्यात यावी अशी याचिका केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणीनंतर मिश्रा यांना सुप्रीम कोर्टानं तात्पुरती मुदतवाढ दिली आहे. त्यामुळं केंद्रासाठी हा दिलासा मानला जात आहे. (SC permits ED Director SK Mishra to continue as ED Director till September 15)

ईडीचे संचालक एस. के. मिश्रा यांचा सध्याचा कार्यकाळ ३१ जुलै २०२३ रोजी संपणार होता. पण आता सुप्रीम कोर्टाच्या परवानगीनुसार, १५ स्पटेंबर २०२३ पर्यंत त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. पण यापुढे त्यांचा कार्यकाळ वाढवून मिळणार नाही असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं १५ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून एस. के. मिश्रा यांना ईडीचं कार्यालय सोडावं लागणार आहे. (Latest Marathi News)

यापूर्वीची मुदतवाढ बेकायदा - SC

दरम्यान, ईडीचे संचालक एस. के. मिश्रा यांना तीनदा दिलेली मुदतवाढ बेकायदा असल्याचं सुप्रीम कोर्टानं यापूर्वीच म्हटलं होतं. त्यामुळं केंद्रानं आत्ता पुन्हा एकदा मुदत वाढीसाठी दाखल केलेल्या याचिकेची कोर्टात दखल घेतली जाणार नाही, असा अंदाज होता. पण तरीही कोर्टानं ही तात्पुरती मुदतवाढ दिली आहे. (Marathi Tajya Batmya)

तिघांची कमिटी करणार नियुक्ती

सुप्रीम कोर्टानं ईडीच्या संचालकांच्या नेमणुकीबाबत महत्वाचे निर्देश दिले होते. त्यानुसार, यापुढे ईडीच्या संचालकांची नेमणूक ही केंद्र सरकारकडून केली जाणार नाही. कारण या पदावर सरकारकडून मर्जीतल्या लोकांची नेमणूक होत असल्याचा ठपका सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी ठेवला होता.

त्याचबरोबर यापुढं ईडीचे संचालक नेमताना तीन सदस्यांच्या कमिटीद्वारे ही नेमणूक केली जाईल. यामध्ये सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश, देशाचे पंतप्रधान आणि विरोधीपक्ष नेता या तिघांचा समावेश असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: शेतात विजेच्या धक्क्यामुळे एकाच कुटूंबातील पाचजण ठार

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT