mannan wani
mannan wani 
देश

लष्कराच्या हल्ल्यात हिज्बुलचा 'स्कॉलर' दहशतवादी ठार

वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू-काश्मिरमधील हंदवाड्यात दहशतवादी व लष्करामध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. शोपियाँ येथे झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. ठार केलेल्या दहशतवाद्यांपैकी एक हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर असल्याचे म्हणले जाते, पण या वृत्ताला पोलिसांनी अजून दुजोरा दिलेला नाही.

दहशतवादी हे हंदवाडा परिसरातील शाहगूंड या गावात लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. शोधकार्य सुरू केले असता दहशतवादी व जवानांमध्ये चकमक झाली. यात दोन दहशतवाद्यांना मारण्यात आले, तसेच चकमक झालेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला, तो जप्त करण्यात आला. दोन मृत दहशतवाद्यांपैकी एक मन्नान बशीर वाणी हा अलिगढ मुस्लिम विद्यापीठात संशोधक होता. तसेच विद्यापीठाचा अतिशय हुशार विद्यार्थी होता. 

या दरम्यान शोपियाँमधील चकमकीत दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच जवान घटनास्थळी पोहोचले असल्याची माहिती कळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT