PM Modi Raksha Bandhan eSakal
देश

PM Modi Raksha Bandhan : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कशा प्रकारे साजरा केला रक्षाबंधनाचा सण? पाहा व्हिडिओ

Raksha Bandhan 2023 : आज देशभरात उत्साहाने रक्षाबंधनाचा सण साजरा होतो आहे.

Sudesh

Narendra Modi : आज देशभरात उत्साहाने रक्षाबंधनाचा सण साजरा होतो आहे. बहीण-भावाच्या गोड नात्याचा हा सण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही साजरा केला. पंतप्रधानांना शाळकरी मुलींनी आज राख्या बांधल्या. दिल्लीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगाचा व्हिडिओ समोर आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी, म्हणजेच 7 लोक कल्याण मार्गावर हा कार्यक्रम पार पडला. याठिकाणी विविध शाळांमधील मुली उपस्थित होत्या. या सर्वांनी पंतप्रधान मोदींना राखी बांधली. त्यानंतर पंतप्रधानांनी या मुलींसोबत ग्रुप फोटो देखील काढला.

पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी एक्स (ट्विटर) पोस्ट करत देशातील नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देखील दिल्या.

"माझ्या सर्व कुटुंबीयांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. बहीण आणी भावामध्ये असणारा अतूट विश्वास आणि अगाध प्रेमाला समर्पित रक्षाबंधनाचा पवित्र सण हे आपल्या संस्कृतीचं प्रतिबिंब आहे. हा सण प्रत्येकाच्या जीवनात स्नेह, सद्भाव आणि सौहार्दाची भावना अधिक दाट करेल, अशी माझी इच्छा आहे." असं पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT