varun gandhi esakal
देश

Video: फी न भरल्याने 'तिला' परीक्षेला बसू दिलं नाही; भाजपच्या 'या' नेत्याने...

सकाळ डिजिटल टीम

उन्नावः शाळेची फी भरली नाही म्हणून एका विद्यार्थीनीला परीक्षेला बसू न दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. खासदार वरुण गांधी यांनी व्हीडिओ शेअर करीत माणुसकीला विसरु नका, असं आवाहन केलंय.

उत्तर प्रदेशातल्या उन्नाव जिल्ह्यात ही घटना घडली आहे. वरुण गांधी यांनी मंगळवारी ट्विटरवर एक व्हीडिओ शेअर केला. ज्यामध्ये एक मुलगी रडत रडत फी न भरल्यामुळे शाळेने परीक्षेला बसू न दिल्याची तक्रार केली आहे.

या व्हीडिओसोबत वरुण गांधी यांनी, ''या मुलीचे अश्रू त्या लाखो मुलांच्या यातना आहेत ज्यांना फी नसल्यामुळे अवहेलना सहन करावी लागली. आर्थिक संकटामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात बाधा येऊ नये, याची जिल्ह्यातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. खाजगी संस्थांनी मानवता विसरु नये, शिक्षण हा व्यवसाय नाही'' असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

माहितीनुसार, हा व्हीडिओ उन्नावच्या बांगरमऊजवळ टोला नावाचं एक छोटं शहर आहे, तिथला आहे. या व्हीडिओमध्ये विद्यार्थीनीला गेटबाहेर उभं केल्यामुळे ती ढसाढसा रडू लागली. सहावीत शिकणारी अपूर्वा सिंह हिने सांगितलं की, आज माझे वडील पैसे घेऊन येणार आहेत. तरीही मला शाळेबाहेर काढलं. तिचा हा व्हीडिओ व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे तिच्यासोबत आणखी मुलांनाही परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : संजू सॅमसन गरजला! ख्रिस गेलचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत निर्णायक वळण

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनची मॅच विनिंग खेळी! ७ चौकार, ६ षटकारासह ८७ धावा; चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीत कायम, दिल्लीचं काय?

West Bengal : ममतांचा राजीनाम्यास नकार, भाजपचा मुख्यमंत्री कसा होणार? राज्यपालांकडे काय पर्याय?

पर्वती पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिक संतप्त; संशयिताला अटक, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात

जुना बोरामणी नाका ‘ब्लॅक स्पॉट’! रुग्णाचे रक्ताचे नमुने घ्यायला जाताना रक्तपेढीचा कर्मचारी ठार; 1 वर्षाच्या मुलीचा 3 दिवसांपूर्वीच झाला होता वाढदिवस

SCROLL FOR NEXT