scientific survey Controversial Mathura scientific survey Controversial Mathura
देश

मथुरा वादग्रस्त संकुलाच्या वैज्ञानिक सर्वेक्षणावर ४ महिन्यांत निर्णय घ्या : हायकोर्ट

अर्ज निकाली काढण्याचे निर्देश दिले आहे

सकाळ डिजिटल टीम

scientific survey Controversial Mathura प्रयागराज : अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुरा (Mathura) जिल्हा न्यायालयाला चार महिन्यांत सुनावणी पूर्ण करून शाही ईदगाह मशिदीच्या वादग्रस्त जागेचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची मागणी करणारा अर्ज निकाली काढण्याचे निर्देश दिले आहे. मनीष यादव यांच्या अर्जावर अधिवक्ता रामानंद गुप्ता यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती पीयूष अग्रवाल यांनी हा आदेश दिला.

अर्जानुसार, भगवान श्री कृष्ण विराजमान यांच्या वतीने वादग्रस्त जागेचे वैज्ञानिक सर्वेक्षण आणि देखरेखीसाठी कोर्ट कमिशनरची नियुक्ती करण्याची मागणी गेल्या वर्षी मथुरा (Mathura) जिल्हा न्यायालयात प्रार्थनेवर दाखल करण्यात आली होती. एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरी या अर्जावरील सुनावणी पूर्ण होऊ शकली नसल्याचे सांगण्यात आले.

याचिकाकर्ते मनीष यादव यांनी अलीकडेच अलाहाबाद उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून सुनावणी लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. अर्जात हायकोर्टाला (High Court) या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती.

या अर्जावर उच्च न्यायालयाने अधीनस्थ न्यायालयाकडून अहवाल मागवला होता. सोमवारी उच्च न्यायालयाने हा अर्ज निकाली काढताना मथुरा जिल्हा न्यायालयाला मनीष यादव यांच्या अर्जावर चार महिन्यांत सुनावणी पूर्ण करून निकाल देण्याचे निर्देश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT