Brahmayoni Hill Gaya 
देश

बिहारमधील ब्रह्मयोनी टेकडीवर सापडल्या वनौषधी! मधुमेहावरील औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 'गुरमार'चाही समावेश

Scientists discover medicinal plants in Gaya Bihar : ‘गयेतील ब्रह्मयोनी टेकड्यांवरील पारंपरिक वनौषधींचे संशोधन’ अशा शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

रोहित कणसे

नवी दिल्ली, ता.११ (पीटीआय) ः बिहारमधील गया येथील ब्रह्मयोनी टेकडीवर औषधी वनस्पतीच्या विविध प्रजातींचा शोध लागला आहे. यात प्रामुख्याने गुरमार या वनस्पतीचा समावेश असून मधुमेहावरील औषधांमध्ये या वनस्पतीचा वापर केला जातो. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या(सीएसआयआर) वतीने गुरमार या वनस्पतीचा वापर मधुमेहावर देण्यात येणाऱ्या बीजीआर-४३ या औषधात करण्यात येतो.

‘गयेतील ब्रह्मयोनी टेकड्यांवरील पारंपरिक वनौषधींचे संशोधन’ अशा शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. येथे आढळणाऱ्या पारंपरिक वनौषधींचा नियमित वापर करण्यात येत असल्याने या नामशेष होऊ नयेत यासाठी स्थानिकांनी या वनस्पतीच्या वापराप्रमाणेच त्यांची विपुल प्रमाणात लागवडही करायला हवी असे आवाहन या अहवालात करण्यात आले आहे. ‘गुरमार’प्रमाणेच पिथेसेलोबियम डल्स आणि झिझिफस जुजबा या दोन औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती आढळल्या असून त्यावर अद्याप संशोधन सुरू आहे.

दस्तऐवजीकरण होणार

शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागतील स्थानिकांकडून वापरण्यात येणाऱ्या वनौषधींवर संशोधन करणे आणि त्यांचे दस्तऐवजीकरण करणे या उद्देशाने हे संशोधन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या वनौषधींचे गुणधर्म समजावून घेण्यासाठीही हे संशोधन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार ; कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्रासाठी 'ऑरेंज अलर्ट'

Maratha Reservation: ''आंदोलनं बंद करा'' छगन भुजबळांचा राज्यातल्या ओबीसी आंदोलकांना संदेश; नेमकं काय म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : ओबीसी आंदोलकांनी शांतता पाळावी- छगन भुजबळ

'संगीत देवबाभळी' फेम शुभांगी सदावर्ते पती आनंद ओकपासून विभक्त; सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

Zomato Platform Fee Hike : झोमॅटोवरून ऑर्डर करणं पडणार महागात; कंपनीकडून प्लॅटफॉर्म शुल्कात 'इतक्या' रुपयांची वाढ...

SCROLL FOR NEXT