हुतात्म्यांची मोदींनी माफी मागावी; केजरीवालांची मागणी sakal media
देश

हुतात्म्यांची मोदींनी माफी मागावी; केजरीवालांची मागणी

ममतांकडून शेतकऱ्यांचे अभिनंदन

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेनंतर काँग्रेससह विरोधकांनी हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी: शेतकऱ्यांचे अभिनंदन. आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांप्रति संवेदना व्यक्त करते.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल : शेतकऱ्यांच्या लढाईला मिळालेला हा विजय आहे. सातशेहून जास्त शेतकरी या वर्षभराच्या काळात मृत्युमुखी पडले त्यांचीही मोदींनी जाहीर माफी मागावी.

कॅप्टन अमरिंदरसिंग : कायदे मागे घेतल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन. गुरुनानक जयंतीच्या पवित्र दिनी हे कायदे काळे कायदे मागे घेऊन मोदी सरकारने प्रत्येक नागरिकांच्या भावना जपल्या.

भाकिसं’ अध्यक्ष बद्रीनारायण चौधरी : कायदे मागे घेण्याची घोषणा ठीक आहे. खरा प्रश्न शेतकऱ्यांचे बाजारात होणारे शोषण रोखणे हा असून हमीभावाबद्दल शेतकऱ्यांना खात्री देणे हेही आवश्यक आहे.

‘एमआयएएम’ अध्यक्ष असदउद्दीन ओवैसी : ''दहन पर हैं उन के गुमाँ कैसे-कैसे, कलाम आते हैं दरमियाँ कैसे-कैसे, ज़मीन-ए-चमन गुल खिलाती है क्या-क्या, बदलता है रंग आसमाँ कैसे-कैसे. भाजपची दुर्बल अवस्था पाहता आगामी निवडणुकांच्या अगोदर हे काळे कायदे मागे घेणे मोदी सरकारला क्रमप्राप्त होते आणि तसेच झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

SCROLL FOR NEXT